सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे गुणवंतांचा सत्कार
प्रतिनिधी .प्रवीण मेश्राम
नुकताच महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचा वर्ग बारावीचा निकाल घोषित झाला.
गडचांदुर शहरातील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय कला, विज्ञान व व्यवसाय विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ व सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
यात सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील कला विभागातून 89% टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम आलेल्या कु. निकिता काळे, 87% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या संजिवनी ठमके आणि 83.50% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्वप्नील चिडे या विद्यार्थ्यांचा तसेच
महाविद्यालयातील विज्ञान विभागातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी अनुक्रमे कु. साधना साईनाथ शेरकी, कु.प्रचीता बंडू सिडाम (संयुक्त 81.34%), कु. साक्षी अनील चहारे (80.17%) तसेच सान्वी खेमदेव देवाळकर(79.83%) या विद्यार्थिनींचा तसेच
महाविद्यालयातील व्यवसाय शिक्षण विभागातील
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त अनुक्रमे तुषार जोंधळे, कु. श्रुती पाकलवार व रजनीश गाडगे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तू. ता. पूंजेकर, प्रमूख पाहुणे म्हणुन सहसचिव विनायकराव उरकुडे
प्रमूख मार्गदर्शक म्हणुन संस्थेचे माजी सचिव तथा पंचायत समिती कोरपना चे माजी सभापती नोगराज मंगरूळकर, संस्थेचे संचालक मा. ना. मंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मराज काळे, पर्यवेक्षक संजय गाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शूभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ आनंदराव अडबाले यांनी विद्यार्थांना भावी जीवनात यशस्वी होऊन महाविद्यालयाचे नाव लौकीक करावे असा मार्मिक सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य धर्मराज काळे यांनी केले तर सूत्र संचालन कला विभाग प्रमुख प्रा. जहीर सैय्यद यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. नितीन सुरपाम यांनी केले.