महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गडचांदूर/प्रतिनिधी – गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे नुकताच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विठ्ठल थिपे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, संचालक रामचंद्र सोनपितरे, प्राचार्या स्मिता चिताडे, उपप्राचार्य विजय आकनुरवार उपस्थित होते .
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कला शाखेतून प्रथम क्रमांक ९६.८३ टक्के गुण प्राप्त करून नदीम कमल जमील सिद्दिकी, द्वितीय क्रमांक ९१.६६ टक्के गुण प्राप्त करून भाग्यश्री छगन गेडाम तर तृतीय क्रमांक ८८.६७ टक्के गुण प्राप्त करून मीना दीपक नायक हिने पटकाविला. विज्ञान विभागातून प्रथम क्रमांक ९१.६६ टक्के गुण प्राप्त करून मोनी मल्लेश तंगडपल्लीवार, द्वितीय क्रमांक ९०.१६ टक्के गुण प्राप्त करून गौरव बंडू वरारकर तर तृतीय क्रमांक ८९.८३ टक्के गुण प्राप्त करून अवंती भाऊराव काकडे हिने पटकाविला. व्यवसायिक अभ्यासक्रमातून प्रथम क्रमांक ७६.१६ टक्के गुण प्राप्त करून चेतन रवींद्र नांदे, द्वितीय क्रमांक ७४.८३ टक्के गुण प्राप्त करून तृप्ती नितेश पिदुरकर हिने तर. तृतीय क्रमांक ६९.६६ टक्के गुण प्राप्त करून विनायक बालाजी कागणे याने मिळविला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्था व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले प्रास्ताविक उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले तर आभार प्रा. माधुरी पेटकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.