महाराष्ट्र पोलीस दलातील जमबो भरती साठी स्टूडेंट फोरम ग्रुप कोरपना सज्ज
कोरपना येथील तालुका क्रीडांगणावर स्टूडेंट फोरम ग्रुप कोरपना तर्फे घेण्यात येणाऱ्या पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज सेनादलातील निवृत्त मा. कुंभारे मेजर साहेब यांच्या हस्ते सामाजिक अंतर पाळत करण्यात आले. या प्रसंगी 100 अधिक प्रशिक्षणार्थी तरुणांनी तथा तरुणी हजर राहून ग्रुप तर्फे होणाऱ्या शिबिराच्या माध्यमातून यशस्वी आयुष घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी बोलताना मा. कुंभारे मजेर यांनी विद्यार्थ्यांना कठोर नेहणीतीच्या जोरावर कोणतेही यश प्राप्त करता येथे हे सांगत पुढेचे काही महिने हे तुमच्या शरीराला वेदना देणारे असतील पण ते तुमच्या भविश्यकाळाच्या सुखी आयुष्या शिदोरी असेल असे मनोगत व्यक्त केले. तसेच या प्रसंगी कोरपना पोलिस स्टेशनचे मा. कोडवले मेजर यांनी सुद्धा प्रशिक्षणारथीं तरुण तरुणींना मार्गदर्शन करून पोलिस विभागात येऊन राष्ट्र सेवा करावी असे आव्हान केले. तसेच या प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व मदत पोलिस स्टेशन कोरपना तर्फे देऊ असे आश्वासन देत स्टूडेंट फोरम ग्रुप अभूतपूर्व कार्य करत असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसंगी मा. दिवाकर कौरसे यांनी सुधा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर भरती पूर्व प्रशिक्षण शिबिर सयोजन करणारे अविनाश महाले, मारोती डोंगे, प्रीतम द्रुर्वे , शरिक सय्यद, अभिषेक तूरणकर, पवन बुरेवर, विनायक उलमले, दिनेश ठेंगळे, अक्रम शेख प्रफुल्ल काटकर, दिलीप जाधव, सागर पारखी, नैनेश आत्राम,शुभम गरघटे, तुषार भोयर, विशाल भोयर,यशवंत झाडे, अजय झाडे, सूरज येडे, प्रशांत टेम्बुर्दे,अझर पठाण, राहुल ठावरी, निखिल अकरेनावेद पठाण ,माणिक कींनाके, अक्षय वैरागडे, अभिजित ठावरी, कृष्णा बोधे , धनंजय लांडे इत्यादी ग्रुपचे संघटक प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ग्रुप तर्फे सदर प्रशिक्षण काही तांत्रिक बाबीची पूर्तता करू दिनांक 27/08/2020 पासून नियमित सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती देऊन परिसरातील तरुण व तरुणींनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले. तसेच सदर प्रशिक्षणाला मैदानी सरावाची तयारी मा. कुंभारे मेजर व प्रीतम दुर्वे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येणार असल्याची तथा लेखी परीक्षेच्या तयारी साठी अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार अशी माहिती सुद्धा या प्रसंगी ग्रुप तर्फे देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचान भूषण बोबडे यांनी केले तथा प्रस्ताविक अविनाश महाले व आभार कृपाल कोल्हे यांनी मानले.