तालुकाध्यक्षांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0
881

*तालुकाध्यक्षांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश*
( कोरपना )प्रवीण मेश्राम
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष शरदभाऊ सुरेशराव जोगी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर, प्रमुख अतिथी सौ. बेबीताई उईके जिल्हाध्यक्षा महिला, जेष्ठ नेते हिराचंदजी बोरकुटे, विधानसभा प्रमुख अरुनजी निमजे, सुनीलजी दहेगावकर, जिल्हाउपाध्यक्ष आबिदजी अली, इंगळे साहेब, संजयजी वैद्य, उईके साहेब, रफीकजी निजामी, उपस्थित होते.
अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून सतिशजी मालेकर संस्थापक अध्यक्ष शिव ब्रिगेड संघटना महा., ओबीसी योद्धा प्राध्यापक अनिलजी डहाके, राजुरा तालुका अध्यक्ष संतोषजी देरकर, आरीफजी खान, थुट्रा उपसरपंच वामनरावजी भिवापुरे, सौ. कल्पनाताई निमजे गटनेता, सौ. अश्विनीताई कांबळे शहर महिलाध्यक्षा, सौ. मिनाक्षीताई एकरे नगरसेविका, यांनी उपस्थिती दर्शवली. या सोहळ्याचे प्रास्ताविक अबिदजी अली यांनी केले. राजेंद्रजी वैद्य यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करतांना म्हटले, गडचांदूर नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष म्हणून शरदभाऊ यांची निवड अत्यंत योग्य झाली . गडचांदूर नगरीत अनेक विकासाची कामे त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे, कोरपना तालुक्यात राष्ट्रवादी वाढविण्याचा प्रयत्न शरदभाऊंचा आहे, नुसतं राजकारण नाही तर पक्षाच्या अजेंड्यावर असलेल ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण , आणि त्याच पद्धतीने शरदभाऊ करतात.
युवकांचा प्राण, युवकांच्या गळ्यातील ताईत शरदभाऊ ठरतो, सोबतच त्यांच्या राजकीय जीवनाला उत्तरोत्तर पालवी फुटावी, आर्थिक बाजू भरभक्कम व्हावी, त्यांचा संसार सदा सुखी असो, शरदभाऊंना निरोगी उदंड आयुष्य लाभो अशी निर्मिका चरणी प्रार्थना करतो असे मत व्यक्त केले. या प्रसंगी मराठा सेवा संघ गडचांदूर , म. रा.प्राथ. शिक्षक संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
तालुक्यातील अनेक ग्रामशाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहू संख्येनी उपस्थित होते.
या सोहळ्याचे संचालन प्रविण भा. काकडे जिल्हासचिव, तर आभार सुनिल अरकीलवार जिल्हाउपाध्यक्ष यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण सिंग भुराणी, प्रविण मेश्राम, सूरज कण्णाके, प्रविणभाऊ कोल्हे, अशोकभाऊ बोधे, सूरज जुनघरी, अभिषेक तुराणकर, महावीर खटोड,मुनिर शेख, आकाश वराटे, मयुर एकरे, वैभव गोरे, सदानंद गिरी, सलीम सयद, अरुण अहेरवार, सतीश भोजेकर, प्रफुल मेश्राम, विजय राठोड, संतोष निखाडे, मयुर जोगी, अतुल टोंगे, संदीप वाघमारे, आकाश ताडे, तीर्थराज सुखदेवें, कार्तिक शेरकी, युवक, महिला राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here