खनके कुटुंबातील आधारस्तंभ हरपला -शरद खनके यांचे दुख:द निधन – अनेकांनी अर्पित केली भावपूर्ण श्रध्दांजली
चंद्रपूर -प्रतिनिधी –
येथील विठ्ठल मंदिर वार्ड निवासी तथा चंद्रपूरातील संस्कार पत संस्थेच्या संचालिका ज्याेति किरण घाटे यांचे जेष्ठ बंधू शरद आनंदराव खनके यांचे आज रविवार दि.१आँगष्टला अल्पश्या आजाराने सकाळी ९वाजून १३मिनिटांनी त्यांच्या जटपूरा वार्ड निवासस्थानी दुख:द निधन झाले .म्रूत्यू समयी त्यांचे वय ६०वर्षाचे हाेते .गेल्या दाेन ते अडीच महिण्यांपासून डाँक्टर मंडळी कडुन त्यांचेवर उपचार सुरु हाेते .परंतु त्यांचे प्रयत्नाला यश न येता अखेर आज शरद खनके यांची प्राणज्याेत मालवली . त्यांचे पश्चात पत्नी , एक मुलगा , मुलगी , पुतने , बहिनीं ,जावई नातवंडे असा परिवार आहे . जटपूरा विभागाच्या विद्यमान नगरसेविका छबूताई वैरागडे यांनी त्यांचे दुख:द निधनाबाबत दुखवटा व्यक्त करीत आपली भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली दरम्यान जिवती येथील पत्रकार शंकर चव्हाण , चिमूरचे यूवा व्यापारी नितिन लाेणारे , मूलचे राेहित बाेबाटे , महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका मेघा धाेटे , नागपूर निवासी मायाताई काेसरे , सुविधा बांबाेडे यांचेसह अनेकांनी आपल्या शाेकसंवेदना व्यक्त करीत भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. दुपारी ४वाजता दिवंगत शरद खनके यांना चंद्रपूरकरांनी अखेरचा निराेप दिला .