जन शिक्षण संस्थान चंद्रपूर 2 यांच्यातर्फे स्वच्छता पंधरवाडा साजरा
बल्लारपूर/चंद्रपूर, नागेश नेवारे
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जन शिक्षण संस्थान चंद्रपूर 2 यांच्यामार्फत 16 जुलै ते 31 जुलै यादरम्यान स्वच्छता पंधरवडा विविध जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ठिकठिकाणी साजरा करण्यात आला.
सदर पंधरवड्यामध्ये कोरोना ची दुसरी लाट आणि घ्यावयाची काळजी याबद्दल जनजागृती पर कार्यक्रम, वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता याबाबत मार्गदर्शन, सुदृढ आरोग्यासाठी कामाच्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्व यावर जनजागृती, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन, सुंदर मुखवटे तयार करण्याची स्पर्धा, गांडूळ खत व पाण्याचे व्यवस्थापन याबद्दल विविध ठिकाणी मार्गदर्शन, वृक्षाचे मानवी जीवनात महत्त्व आणि होणारे फायदे याबद्दल जनजागृतीपर कार्यक्रम, घरा घरांचा सर्वे आणि सॅनिटरी पॅड या विषया बद्दल मार्गदर्शन आणि जनजागृती, एकदा उपयोगात येणारे प्लास्टिक आणि शौचालयाचा नियमित वापर याबद्दल जनजागृती, सांसद आदर्श ग्राम येथे श्रमदान इत्यादी जनजागृती आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम ठिकाणी राबविण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये त्या त्या विषयाचे तज्ञ व्यक्ती यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये स्वच्छता हा एक महत्त्वाचा भाग असून याकडे नागरिकांचे विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी व त्यांना स्वच्छतेची जाणीव करून देण्यासाठी विविध कार्यक्रमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमांसाठी जन शिक्षण संस्थान चंद्रपूर 2 यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन स्वच्छता पंधरवडा यशस्वीरित्या साजरा केला.