धक्कादायक! शेतकऱ्यास कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

0
1133

धक्कादायक!
शेतकऱ्यास कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

गुन्हेगारी प्रवृत्ती असलेला आरोपी हा अनेक गुन्ह्यात सहभागी

आरोपी हा ‘बहुचर्चित आवाळपुर पतसंस्था घोटाळ्या’तील मुख्य आरोपी असल्याची माहिती

 

कोरपना/प्रतिनिधी : तालुक्यातील आवाळपुर येथील शेतकरी अजित नामदेव बोधाने (वय 45) यांच्यावर त्यांच्याच शेतात जाऊन गुन्हेगारी वृत्तीचा अविनाश बबन चौधरी व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी कोयत्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिनांक 30 जुलै 2021 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आवाळपुर येथे घडली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.अधिक माहितीनुसार जखमी शेतकरी अजित नामदेव बोधाने हे नियमितपणे आपल्या शेतात काम करत असताना आवाळपुर येथील अविनाश बबन चौधरी व त्याचे साथीदार आकाश नामदेव घोटकर रा. आवाळपुर व विठ्ठल तुळशीराम चौधरी रा. हिरापूर हे दुचाकीने अजित बोधाने यांच्या शेताजवळ थांबले व बोधाने यांच्या मालकीचा शेतातील सोयाबीच्या उभ्या पिकातून चालत जात असता अजित बोधाने यांनी त्यांना पिकाची नासाडी होत असल्याने शेतातून न जाता दिलेल्या रस्त्याने जायला सांगितले. यामुळे रागात भांबावलेल्या अविनाश चौधरी व त्याच्या साथीदारांनी अजित बोधाने यांना शिवीगाळ करीत मारहान करायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता अविनाश चौधरी यांच्या सोबत असलेले दोन साथीदारांनी बोधाने यांना पकडत अविनाश चौधरी यांनी बोधाने यांच्यावर कोयत्याने सपासप वार करून पळ काढला. शेतात रक्ताने माखलेल्या अवस्थेत असलेल्या अजित बोधाने यांना बघून त्यांना दिलीप दुतकोर यांनी दुचाकीवर घेऊन पोलीस ठाणे गाठले असता पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

जखमी व्यक्तीचा फिर्यादी वरून आरोपी अविनाश बबन चौधरी, आकाश नामदेव घोटकर व विठ्ठल तुळशीराम चौधरी त्यांच्यावर कलम 323, 324, 504, 506, व कलम 34 नुसार गुन्हा दाखल करत आरोपींना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्ह्याची नोंद

अविनाश चौधरी हा आवाळपुर येथील बहुचर्चित पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या गुन्ह्याची नोंद असून दीड वर्ष कारावास भोगून बाहेर आल्याची माहिती आहे. आरोपीवर यापूर्वीही गावातील अनेक नागरिकांना व युवकांना धमकावणे मारहाण करने असले आरोप व गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here