‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ ; महाडोळी रस्त्याची दयनीय अवस्था

0
958

‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ ; महाडोळी रस्त्याची दयनीय अवस्था

सार्वजनिक बांधकाम विभाग ला अभिजित कुडे यांनी दिले निवेदन

लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग रस्ता दुरुस्तीकडे केव्हा देणार लक्ष

लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात आले नाहीतर अभिजित कुडे यांचा आंदोलन छेडण्याचा इशारा

महाडोळी हा जवळपास दीड की.मी. अंतराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामूळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा तर लागतोच परंतु पायदळ व्यक्तींना या रस्त्यावरून चालतांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ता तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे यांनी बांधकाम विभागाकडे निवेदन सादर केली. आजतागायत या रस्त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. महाडोळी वासियांचां जीव धोक्यात आला असून हे खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे.

 

 

सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. यासाठी निवेदन सादर केली. यापूर्वी रस्त्यातील खड्डात झाडे लावुन निषेध करण्यात आला होता. या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. खड्डात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत हे देखील समजतं आहे. रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक तर नव्याने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा खड्डे बुजविण्यात यावे. अशी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अभिजित कुडे यानी दिला आहे. निवेदन देउन या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग येत नाही त्यामूळे याना धारेवर धरल्याशिवाय पर्याय नाही. लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी केली अभिजित कुडे यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष सचिन मांडवकर रोशन भोयर, संकेत वानखेडे, ऋषिकेश पाटील, कुणाल गौळकर उपस्तीथ होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here