महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास .
कोरपना ता.प्र.-प्रवीण मेश्राम
गडचांदूर महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक अक्षरशः वैतागले असून शहर असो की खेडे प्रत्येक ठिकाणी सतत सुरू असलेल्या वीजेच्या लपंडावमुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.”शंभर टक्के वसूली करता तर शंभर टक्के विज पुरवठा का देत नाही” असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारलं जात आहे.
यांच्या भोगळ कारभाराचा असा ही एक प्रकार समोर आला आहे.येथील सा.बा.विभाग(PWD)विश्रामगृहा जवळ मागील 10 दिवसांपूर्वी महावितरण कंपनीने नगरपरिषदेला न कळवता स्ट्रीट लाईटचे वायर कापले.हे दृश्य पाहून न.प. गटनेता,नगरसेवक विक्रम येरणे यांनी सदर विषयी विचारले असता “एक दोन दिवसात नवीन पोल लावल्यानंतर स्ट्रीट लाईट वायर पूर्ववत करण्यात येईल”असे सांगण्यात आले.मात्र आज अंदाजे आठ ते दहा दिवसाचा कालावधी लोटूनही नवीन पोल लावण्याची कारवाई पूर्ण झालेली नाही.यामुळे देशपांडे ले-आऊट आणि थुटरा रोड वरील स्ट्रीट लाईट बंद आहे.पावसाळ्याचे दिवस व अंधारामुळे साप,विंचू व इतर विषारी जीवजंतू रोडवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे वाटसरूंच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.यांच्या चुकीमुळे लोकांना नाहक अंधाराचा त्रास सहन करावा लागत असून लोकांचे जीव धोक्यात असताना स्थानिक विद्युत मंडळ आणि त्यांचे ठेकेदार झोपा काढत असल्याचे आरोप होत आहे.कोणतीही पूर्व सूचना न देता या काळात शेतकऱ्याचे शिजन चालू आहे.पण त्यांना न जुमानता घरची. लाईट कट केल्या जात आहे .यांची मुजोरी जास्त प्रमाणात वाढले आहे या मुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो.
गटनेता येरणे यांचा यासंबंधी सतत पाठपुरावा सुरू असल्याने त्यांनी पुन्हा विद्युत मंडळच्या कनिष्ठ अभियंतांना सदर समस्येबद्दल विचारणा केली असता “पाऊस सुरू आहे,पुन्हा एक,दोन दिवस लागतील” अशी उडवाउडवीची उत्तरे नगरपरिषद कर्मचारी आणि यांना सुद्धा मिळाली आहे.जर उद्यापर्यंत हे काम झाले नाही तर संबंधितांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा गटनेता येरणे यांनी केला.आता संबंधित विभाग याला किती गंभीरतेने घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.