नवा कोरा तीस लाखाचा रस्ता गेला वाहून… उन्हाळ्यात बनला होता टेकामांडवा येथील पांदनरस्ता

0
736

नवा कोरा तीस लाखाचा रस्ता गेला वाहून…

उन्हाळ्यात बनला होता टेकामांडवा येथील पांदनरस्ता

जिवती/प्रतिनिधी : आदिवासी बहूल तालुक्यातील टेकामांडवा ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत गावापासून ते भिंगेवाड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे बांधकाम २५ जून २०२१ ला पूर्ण झाले होते. मात्र या एकाच महिन्यात तीन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे तो तीस लाख रुपयाचा पांदन रस्ता या पहिल्याच पावसात वाहून गेला त्यामुळे त्याच्या चौकशीची मागणी शिवसेनेच्या सिंधुताई जाधव यांनी केली आहे.

 

ग्रामपंचायत टेकामांडवा येथे रस्त्याचे काम विविध योजने अंतर्गत होत आहे. रस्त्यामुळे गावाच्या विकासालाही सजग दृष्टी प्राप्त होते. पण लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या मनमानी कारभारा मुळे गाव विकासाला चालना मिळत नाही आहे असे चित्र ग्रामपंचायत टेकामांडवा येथे दिसून येत आहे.
शासनाचा पैसा हा सर्वसामान्य माणसाच्या घामा कष्टातून उभा होतो, यातून होणारी विकासकामे दर्जेदारच असली पाहिजे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत टेकामांडवा ग्रामपंचायत मध्ये गावापासून ते भिंगेवाड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाच झाले आहे. विकास कामाला विरोध नाही. पण निकृष्टदर्जाची कामे का म्हणून खपवून घ्यायची. गावविकासासाठी आम्ही सोबत आहोत मात्र शासनाच्या पैशाचा योग्य विनियोग होतं नसेल तर व अशा कामाची चौकशी अधिकारी करीत नसेल तर वेळप्रसंगी आंदोलन करु मात्र ग्राम पंचायत टेकामांडवा येथील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. असा खणखणीत इशारा शिवसेना जिवती तालुका महिला संघटीका सिंधुताई जाधव यांनी दिली आहे.

विकासकामामुळे गावांच्या विकासालाही सजग दृष्टी प्राप्त होतो मात्र काही निद्रिस्त अधीकारी आपल्या मनमानी कारभारामुळे गावातील विकास कामे निकृष्ट दर्जाचे होत आहेत. यामुळे गाव विकासालाही खिळ बसल्याचे चित्र ग्रामपंचायत टेकामांडवा येथे दिसत आहे. टेकामांडवा ग्रामपंचायत कडे प्रशासकीय अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे असा आरोप सुध्दा शिवसेना महिला संघटीका तालुका जिवती सिंधुताई जाधव केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here