राजुरा येथील कोरोनटाइन सेंटरमध्ये मध्ये आढळून आला अव्यवस्थेचा प्रकार
शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
अमोल राऊत(प्रतिनिधी, राजुरा)
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका राजुरा येथे कोरोनटाइन सेंटर मध्ये अवैध प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. देशात कोरोना महामारीची साथ सुरू असून या रोगाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. मात्र कोविड 19 संशयित क्वारेन्टीन असलेल्यांच्या सोयी सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब राजुरा येथील क्वारेन्टीन केंद्रावर उघडकीस आली आहे. आदीवासी मुलांचे वसतिगृह राजुरा येथे हे कोरोनरटाइन सेंटर अस्तित्वात आहे. येथे covid- 19 चे बाधित रुग्ण व संशयित रुग्णांना ठेवण्यात आले आहे.
मात्र या सेंटर ला असलेल्या रुग्णाची योग्य दाखल घेतल्या जात नाही आहे. प्रत्येक रुग्णावर शासनाकडून खर्च मिळत असूनसुध्दा त्यांना चांगला आहार न देता, अड्ड्या असलेले अन्न खायला दिल्या जात आहे. या वरून सरळ लक्षात येते, covid-19 सेंटर वरील अधिकारी रुग्णाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
शहरात मोठा प्रमाणात डेंगू , चिकणगुनिया ची संक्रमण चालू असून सुद्धा या covid-19 सेंटर मध्ये स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून जिल्हात दारू बंदी असून देखील येते अवैध दारूच्या खाली बॉटल सापडल्या आहेत. सेंटर वरील आरोग्य कर्मचारी गाढ झोपत आहेत.
रुग्णांना शिळे अन्न खायला दिल्या जाते,तसेच भातात अड्ड्या असलेले अन्न खायला घातल्या जात आहे. यावरून सेंटर वरील कर्मचाऱ्यांचा आळशी व स्पष्ट दुर्लक्षितपणा दिसून येत आहे. यांच्या अशा वागण्याचे परिणाम रुग्णांना भोगावे लागत आहे.
Covid-19 च्या या महामारी काळात लोकांचे संरक्षण करण्यात येथील कर्मचारी वर्ग कर्तव्यदक्ष नाही आहेत. हा रुग्णांच्या कुटूंबियांचा चर्चा विषय बनला आहे.क्वारेन्टीन असलेल्यांना मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेच सामना करावा लागत आहे. आरोग्य विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षपणाचा कळस यात दिसून येत आहे. वारंवार समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची खंत येथील क्वारेन्टीन असलेल्यांनी केली आहे.