कोरोनामुळे कर्तापुरुष गेलेल्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून आर्थिक मदत 

0
806

कोरोनामुळे कर्तापुरुष गेलेल्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून आर्थिक मदत 

समारंभाला फाटा देत समाजातील गरीब, गरजू कुटुंबांना मदतीचा हात 

पोंभुर्णा/प्रतिनिधि

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,झगमगाट व समारंभाला फाटा देत समाजातील गरीब, गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचे ठरवले होते. कोरोना महामारीमध्ये अनेक व्यक्ती मृत्यू पावल्या. ज्या कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे,अशा कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिलेचा मृत्यू झाल्याने त्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहते. घरातील मुलांचे संगोपन, शिक्षणाची जबाबदारी त्या महिलेवर, येऊन पडते.अशीच घटना तालुक्यातील फूटाणा मौकासा येथे घडली कोरोना काळात कुटंबातील कर्ता पुरुष हनुमान महामंडरे वय (४६) व पत्नी भावणा हनुमान महामंडरे वय (३७) मुले भावना हनुमान महामंडरे वय (१२) तृप्ती हनुमान महामंडरे वय (१०) तुलशी हनुमान महामंडरे वय (८) व वंश हनुमान महामंडरे वय (६) असा कुटूंब होते. हनुमान मोल मजुरी करुन पत्नी व चार मुलांचा उदरनिर्वाह करुन सांभाळ करायचा परंतू दोन-तिन महिन्यापुर्वी कोरोनाच्या महामारीत हनुमान महामंडरे याला कोरोनाची लागन झाली व पुढिल उपचारासाठी चंद्रपुर येथील मेडिकल कॉलेजला भरती केले परंतू उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

हनुमानच्या जाण्याने कुटूंबासह पत्नी व चार मुलांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. समाजातील हे चित्र पाहून शिवसेनेचे पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा न करता शिवसेना जिल्हाप्रमूख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी सामाजिक उपक्रम करण्याचे केलेल्या आवाहनाला साथ देत उमरी पोतदार येथील घरचा कर्ता पुरुष गमावलेल्या मनोज यादव उपरे वय (३४) च्या कुटूंबाला अल्पशी का होईना, पन आर्थिक मदत करायचे शिवसेनेने ठरवले. त्याचे आयुष्य संपले मोलमजुरी करुन जगणारा माणूस गेल्याने कुटूंबातील पत्नी व तिन मुलांवर मोठे संकट ठाकले आहे. अशा गरजू कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन त्या कुटूंबातील मुलांच्या शिक्षणासाठी जबाबदारी व प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत शिवसेनेतर्फे करण्यात आली. आहे. शिवसेनेने राबवलेल्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, आशिष कावटवार,शहर प्रमुख गणेश वासलवार,युवासेना तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार,किशोर डाखरे,सचिन आत्राम,डॉ.अमोल बावणे,पवन गेडाम,महेश श्रिगिरिवार,संदीप ठाकरे,किशोर गुज्जनवार,अंकुश उराडे,वर्षा बापूजी चिंचोलकर,स्वप्निल चौधरी,चंद्रहास खोब्रागडे,प्रतिक पाल,किरण पाल,महादेव देशमुख,खुशाल चिंचोलकर आदी उपस्थीत होते.🔅

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here