विद्युत विभागाचा भोंगळ कारभार केव्हा
थांबणार
हवा आली अन् विज गेली ही परिस्थिती,
तालुक्यातील अनेक गावे अंधारात.
विज पुरवठा अधिकारी यांच्या लहरी धोरणात
ग्रामस्थ काढतो रात्र अंधारात
प्रभाकर खाडे ( रिपाई)
( गडचांदूर)प्रतिनिधी प्रवीण मेश्राम.
कोरपना आणी जिवती – तालुक्यात सध्या सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. आठ दिवसापासून पाऊस व वादळाने तांडव घातले आहे. त्यामुळे वारंवार विज पुरवठा खंडीत होत आहे. ग्रामिण भागात कोणत्याही शासकिय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींचा वचक नाही त्यामुळे विद्युत विभागाचा भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. केव्हांही विज पुरवठा खंडीत होतो, थोडी हवा अथवा पाणी जरी आला तर ‘हवा आली विज गेली ‘ अशी स्थिती निर्माण होते आहेत.
कोरपना , जिवती तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुक्याची ॲलर्जी नित्याचीच .संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कुठे बिघाड झाल्यास एक दोन दिवस किंवा कधीही एकदोन तास विज येण्यासाठी वाट बघावी लागते.
विज पुरवठा बंद राहत असल्याने छोट्या उद्योजकांना फटका बसत आहे.बिल मात्र बराबरच विज पुरवठा आवश्यक असतानाही विज कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. पाणी .रिपरिप असलातरी विज बंद आणी ग्रामिण भागातील विजेचे वाकलेले खांब व लोंबकळणाऱ्या तारांकडेही विद्युत विभागाचे दुर्लक्ष होत आहे.विद्युत लाईनच्या जवळची ट्री कटींग करणे अपेक्षीत असते मात्र ती कागदावरच केली जाते. ग्रामिण भागातील विद्युत तारा कमी उंचीवर असल्याने एखादेवेळी अपघात झाल्यास किंवा तार तुटल्यास जिवंत तार थेट जमिनीवर पडू नये यासाठी जिवंत तारांच्या लाईनखाली गार्डिंग तार लावलेले असतात मात्र तालुक्यातील अनेक गावातील गार्डिंग तार गायब झाले आहेत.विज पुरवठा खंडीत झाल्यास रात्र उकाड्यात आणि डासांच्या उपद्रवात काढावी लागत असल्याने नागरिकांत संबंधित विभागाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. शेजारी नांदाफाटा येथील नाहक डेंग्यूच्या आजारांनी बडी घेतले आहेत. आणी कीहीचे रूग्णालयात उपचारासाठी गेलेत उपचार घेत आहेत . तरीही
विद्युत पुरवठा सुरळीत सुरु करण्यात यावा अशी मागणी येथील रिपब्लिकन पार्टीचे कोरपना तालुका अध्यक्ष यांनी विदर्भाचा विर न्युज नेटवर्क ला कळविले आहे . येथील विज पुरवठा अधिकारी आणी संबंधित कर्मचारी मुजोर असल्याने सर्वसाधारण नागरिकांना वेटीस धरत आहे .