जुन्या पटवारी भवनासमोरील ओपन स्पेसच्या दोन झाडाच्या कारणांनी बगीच्या चे वाल कंपौन झाले तेडे

0
860

जुन्या पटवारी भवनासमोरील ओपन स्पेसच्या दोन झाडाच्या कारणांनी बगीच्या चे वाल कंपौन झाले तेडे

प्रतिनिधी.प्रवीण मेश्राम

गडचांदूर शहर हे कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराला 3 कंपन्यांचा वारसा लाभला असे म्हणायला हरकत नाही. आता गडचांदूर शहर नगर परिषद म्हणून नावारूपास आलेल, आणि त्यातील अनेक विकासाची कामे यातुन पूर्ण होतील असे स्वप्न या नगरीतील नागरिक रंगवीत असतांनाच अचानक एक वेगळीच मोड बघायला मिळते.
नगर परिषद असलेल्या गडचांदूर ला 14 व्या वित्त आयोगानुसार आलेल्या निधीचा वापर शहराच्या विकासावर खर्च करण्यात येणार असा निर्णय नगरपरिषदेने घेतला. यात नालीचे बांधकाम, ओपन स्पेस सौंदरिकरण अशी कामे. सर्व कामे सुंदर रित्या पार पडत आहे. परंतु *प्रभाग क्रमांक 4 मधील जुने तलाठी/ पटवारी भवनासमोरील आणि महत्वाचे म्हणजे शहराच्या मध्यभागी असलेले ओपन स्पेस. याला भिंतीचे कुंपण 4 ही बाजूनी करत असताना मुख्य रस्त्यावरील भिंतीचे फाउंडेशन नागमोडी प्रकारचे बनवण्यात आले, ते बघण्यास योग्य नाही कारण एव्हडा मोठा खर्च करून ओबडधोबड बांधकाम.. कारण विचारले तर 2 वृक्षांची अडचण.. 33 कोटी वृक्ष गेले कुठे हे कुणालाच पत्ता नाही आणि इथे वृक्षांचे कारण सांगून काम चाल ढकल करतांना दिसताय. सोबतच प्रवेश द्वार ही अडचणीत ते असे की, जिथे प्रवेशद्वार असणार आहे त्याच्या अगदी सामोरं इलेक्ट्रिक टॉवर व त्याचे तंगावे. भविष्यात त्याही गोष्टींचा त्रास नागरिकांना होणारच.* इतरही ओपन स्पेस वरील वृक्ष व इतरही अडचणी असतांना तेथील बांधकाम सुरेख व सुरळीत सुरू आहे. एकंदरीत इथे इंजिनिअरच्या दिमाखाचे कौतुक करावे तितके कमीच..
सर्व नागरिकांची विनंती आहे की,
नगर परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सोबतच नगरसेवकांनी परत एकदा सुरू असलेल्या बांधकामाचे निरीक्षण करून पुढील कामास गती द्यावी अन्यथा सुरू असलेले काम आम्ही रोखू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here