कोरोना मृतकानांच्या आठवणी मध्ये वृक्षारोपण “एक झाड – एक स्मृती”
वणी (यवतमाळ)/प्रतिनिधी : कोरोना काळात मृत्यू पावलेल्या लोकांच्या स्मृती जीवंत ठेवण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रधर्म युवा मंच, राष्ट्रसंत युवक युवती मंच व त्रिशरण एनलाईटमेंट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने “एक झाड एक स्मृती” हा उपक्रम राबविण्यात आला.
ह्या उपक्रमाची सुरवात झरपट, निंबाळा आणि सोमनाळा ह्या गावापासून करण्यात आली असून यात पुढे वांजरी, नांदेपेरा, पळसोनी, मूर्धोनी, चारगाव, शिरपूर अश्या अनेक गावांचा समावेश होणार आहे. सध्या स्थितीत 30 लोकांच्या स्मृतीमध्ये 30 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास सरपंच सुनीता ढेंगळे, उपसरपंच राहुल कुत्तरमारे, पशु वैद्यकीय रेड्डीवार, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे मारोतराव ठेंगणे, दिलीप डाखरे, राजू ढेंगळे, रामकृष्ण ताजणे, प्रवीण पेचे, राष्ट्रसंत युवक युवती विचार मंच व राष्ट्रधर्म युवा मंचचे संघदीप भगत, अभिलाष राजूरकर,भारत कारडे, उदयपाल वणीकर, राहुल धुळे, संदीप कुचनकर, संकेत ताजने, संदीप माटे, किसन शेंडे, प्रभाकर ढोके, बंडू झाडे, ईश्वर काळे, विठ्ठल केराम, मीराबाई कुचनकार, नितीन ढोके, अमित बरडे हे ग्रामस्थ उपस्थित होते.