डोंगरशेळकी येथील पाझर तलाव फुटून 50 हेक्टरवरील शेतीचे नुकसान.
बाबूराव बोरोळे
लातूर जिल्हा प्रतिनिधी
इम्फॅक्ट न्युज लातूर
8788979819
उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथील भारतसिंग ठाकूर यांच्या शेतातील पाझर तलाव फुटून तलावाच्या खालील बाजूला असणाऱ्या 50 हेक्टर शेतीवरील नुकसान झाले आहे यामध्ये शेतीमधील पीक,माती, विहिरी, मोटार तसेच स्प्रिंकलर सेट आणि पाईप वाहून गेली आहेत.
सकाळी पुंडासिंग ठाकूर यांनी तलाव फुटत असल्याची कल्पना दिली तात्काळ माजी सरपंच ज्ञानोबा मुंडे,उपसरपंच गणपत पवार,तलाठी दत्तात्रेय मोरे,पोलीस पाटील भालचंद्र शेळके,समाधान कांबळे,रमाकांत पुंड,अविनाश बरुरे,कृष्णकांत मुंडे,राहुल पुंड,अभिषेक बरुरे,बी एन मुंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सकाळी 10 पासून ते 11.20 मिनिट पर्यंत शर्थीचे प्रयत्न करून देखील जेसीबी लवकर उपलब्ध होऊ न शकल्याने पाझर तलाव फुटला.
तलावफुटीच्या घटनेनंतर राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे साहेब #Sanjay Bansode यांना कळविताच त्यांनी प्रशासनाला तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानभरपाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब,मंडळ अधिकारी संतोष चव्हाण,ग्रामसेवक उपासे यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले आहेत येत्या काळात शेतकऱ्यांना लवकरच झालेली नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे साहेबानी दिले आहेत .
सुदैवाने धोंडूतात्या महाराजांच्या आशीर्वादाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.