पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव आणि गंगापूर चा संपर्क तिसऱ्यांदा तुटला: दरवर्षीच पुराचे संकट कायम
पोंभुर्णा प्रतिनिधी
सततच्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण ओव्हरफ्लो झाला असल्यामुळे या धरणाचे काही दरवाजे पाणी विसर्ग करण्यासाठी काही मीटरने वर उचल लले असल्याने गंगा नदीला पूर आला आहे.या नदीला पूर आला असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्णा तालुका अंतर्गत येत असलेल्या जुनगाव आणि गंगापूर टोक या गावांचा तिसऱ्यांदा जगाशी संपर्क तुटला आहे.
जुनगाव च्या चारही दिशांनी वाईन गंगानदी ने वेढा दिला असल्यामुळे पावसाळ्यात या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त होते ही समस्या लक्षात घेऊन तत्कालीन मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या पुढाकारातून वैनगंगेच्या उपप्रवाह वर पुल बांधण्यात आला परंतु या फुलाची उंची फारच कमी असल्यामुळे दरवर्षी या गावांना परिस्थितीशी सामना करावा लागतो. कायमस्वरूपी या गावांना जगाच्या संपर्कात आणण्यासाठी मुलाची उंची वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे मात्र या मागणीला शासनाच्या व प्रशासनाच्या वतीने केराची टोपली दाखवली जात आहे.त्यामुळे या गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे गावात जनावरांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी या पुरामुळे अडचण निर्माण झाली असल्याने गावकरी व पशुपालक चिंतेत सापडले आहेत. मागील सरकारने या मागणीला तेरा ची टोपली दाखवली असली तरी नव्याने महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करून पुलाची उंची वाढवून द्यावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.और