नांदाफाटा आवाळपुर बिबी परिसर जलमय, अनेक घरात पाणी
गावाला मुख्य मार्गाशी जोडणारे मार्ग बंद
आवाळपुर ते गाडेगाव मार्ग बंद
नांदाफाटा/प्रतिनिधी : कालपासून सुरू झालेल्या पावसाच्या झळीमुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नदी नाले तुडुंब भरले असून अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरल्याचे माहिती मिळत आहे. हीच परिस्थिती कोरपना तालुक्यात सुद्धा उदभवली असून कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी असलेल्या नांदाफाटा परिसरातील,आवाळपुर, नांदा, बिबी गावातील सर्व नाले भरले असून अनेक घरात पाणी शिरले आहे. बिबी येथील नांदाफाटा लगत असलेल्या रामनगर परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याची माहिती आहे.
आवाळपुर परिसरातील आवाळपुर ते गाडेगाव मार्गाला जोडणारा आवाळपुर येथील नाला भरल्याने आवाळपुर – गाडेगाव मार्ग बंद झाला आहे. आवाळपूरातील नाल्यालगतच्या काही घरात पाणी शिरल्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
नांदा गावाला मुख्य रस्त्याला जोडणारा प्रभू रामचंद्र महाविद्यालयाजवळील पुल भरल्याने नांदा गावाचा अल्ट्राटेक गेट ला जोडणारा रस्ता बंद झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे या भागात मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.