आठवणीसाठी मृतकांच्या घरी वृक्षारोपन
त्रिशरण फाउंडेशनचा गोंडपिपरीत उपक्रम
जगात कोविड 19 साथीच्या आजाराने हाहाकार आला आहे या आजराने जगभरात मृत्यूची संख्या वाढत आहे तसाच कोविड19 या आजराने आपल्या देशात थैमान घातले असून विशेषतः या आजारात प्राणवायू ची कमतरता भासू लागली आहे . त्यासाठी कोविड 19 या आजराने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या स्मरणात महाराष्ट्र या आजाराचे परिणाम पाहता त्रिशारण एनलारमेंट फाउंडेशन पुणे, यांच्या माध्यमातून एक आठवण आपल्या दारी या उपक्रमाद्वारे कोविड19 या आजराने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्या व्यक्तीच्या स्मरणात एक वृक्ष लावण्यात आले याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात त्रिशारण एनलारमेंट फाउंडेशन, पुणे मार्फत संदिप सुखदेवे जिल्हा समन्वयक चंद्रपूर व धनंजय लोखंडे तालुका समनव्यक गोंडपीपरी यांच्या मार्गदर्शनात गोंडपीपरी तालुक्यात विकासदूत ची निवड केली आणि एक आठवण आपल्या दारी हा उपक्रम राबविला
गोंडपीपरी तालुक्यात कोविड 19 आजाराने मृत्यू झालेल्या कुंटुबात विकासदूत जाऊन एक आठवण आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील मौजा वढोली येथील कोविड19 या आजराने मृत्यू पावलेले पुरुषोत्तम बालाजी कोहपरे यांच्या घरी जाऊन कुंटुबतील सद्यस्य सह गावातील सरपंच राजेश कवठे,ग्रा.प.सद्यस्य संदीप पौरकार ग्रामसेवक झिले प्रतिष्टीत नागरिक सुरज माडुरवार आणि विकासदूत विनोद दुर्गे विकासदूत प्रशांत रायपूरे यांच्या उपस्थितीत आंब्याच्या झाडाची लागवड करण्यात आली तसेच शीतल लोखंडे प्रविणा फुलझेले दर्शना दुर्गे अनिता नागरकर मेघा धमडेरे ज्ञानेश्वर सातपुते नितीन रामटेके अरविंद नैताम या विकसदूतांनी संदिप सुखदेवे जिल्हा समन्वयक चंद्रपूर आणि धनंजय लोखंडे तालुका समन्वयक यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील कोविड19 आजराने प्रभावीत क्षेत्रात जाऊन एक आठवण आपल्या दारी उपक्रम राबविला गेला