नांदा फाटा येथे ‘डेंगू’ चा पहिला बळी
एनआयटी झालेला धम्मदीप कर्मंकर अनंतात विलीन ; जिल्हा डेंगू नियंत्रक पथकाने कॅम्प लावण्याची गावकऱ्यांची मागणी
नांदा फाटा/प्रतिनिधी
कोरपना पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असलेल्या कालीचरण करमनकर यांचा धम्मदीप नावाचा मुलगा वय २१ वर्ष हाय एनआयटी शेवटच्या वर्षाला असताना शिवाय एका फार मोठ्या कंपनीमध्ये त्याला नोकरीसुद्धा प्राप्त झाली होती. मात्र वर्क फ्राम होम सुरू असताना अचानक त्याला डेंग्यूची लागण झाली. उपचारार्थ त्याला नागपूर येथे भरती करण्यात आले. मात्र आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यामुळे परिसरामध्ये भीती सदृश्य वातावरण निर्माण झाले असून डेंग्यू सदृष्य आजाराचे अनेक रुग्ण सद्यस्थितीत गावात व आजूबाजूच्या परिसरात याचे चित्र दिसून येत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने नांदा फाटा परिसरामध्ये डेंग्यू नियंत्रक पथकाचे कॅम्प लावावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून प्रशासनाने सुद्धा स्वच्छतेचा बाबतीमध्ये जागरूकता निर्माण करून विविध आजार नियंत्रण फवारण्या कराव्या अशी मागणी होत आहे.
अगदी उमेदीच्या काळात तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला मुलगा अचानकपणे निघून गेल्याने करमनकर परिवारा वरती दुःखाचा डोंगर पसरलेला असून सध्या नांदा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.