कोरपना तालुक्यातील ताडोधी-कोराडी गावाची दयनीय अवस्था ; रोड नसल्याने जनतेचे ये-जा करणे यातनामय
प्रवीण मेश्राम
तालुक्यातील ताडोधी-कोराडी गावातील रस्त्याने गावकऱ्यांचे येणे जाणे बंद झाले आहे. प्रत्येक वेळी या गावातील जनतेनी या रस्त्या बाबत माहिती देऊन सुद्धा याकडे संबधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या मुळे गावात उदासीनता दिसून येत आहे.गावकरी यांना धड जाण्यासाठी रस्ता नाही. जागोजागी चिखल साचले आहे.
आमदार साहेबांनी या मार्गाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. असा सूर स्थानिक ग्रामस्थांतून निघत आहे. जर हा रस्ता असाच रहाला तर मग हे गावकरी जाणार कुणाकडे असा प्रश्न त्यांना पडला आहे. मागील वर्षी हा रस्ता बनऊन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतेही काम सुरू झाले नाही. केवळ स्थानिक नागरिकांना भूलथापा देण्याचा डाव संबंधितांकडून सुरू आहे.
सदर गावातील जनतेला या रस्त्याने ये-जा करतांना अनेकदा अपघाताला सुद्धा सामोरे जावे लागत आहे. वारंवार स्थानिक जनतेनी समस्या संबंधितांच्या लक्षात आणून सुद्धा याकडे कानाडोळा केला जात आहे. दिवसेंदीवस या भागातील रस्त्याची दयनीय अवस्था होत आहे. सरपंच व ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहे. असे गावातील जनतेचे मत आहे. रस्त्याची दुर्दशा झाली आहे पण मात्र दखल घेतली जात नाही.
या संबंधी पुडलिक तुराणकर यांनी गेले १० वर्षे पासून या रस्त्या विषयी माहिती दिली. पण आज पावेतो संबंधितांकडून या विषयी कोणतीच भूमिका घेण्यात आली नाही. फक्त पोकळ आश्वासन चालू आहे. असे त्यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले. याच रस्त्याने येताना जे नागरिक जखमी झाले. यास जबाबदार कोण? जर एखादी मोठी दुर्घटना घडली तरच प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न स्थानिक जनता विचारत आहे. या सर्व बाबींकडे संबधितांकडून दुर्लक्ष होत आहे. या बाबतीत आमदार साहेबांनी सदर रस्त्या विषयी सुधारणा करावी. असे या कोराडी गावातील जनतेनी आपली व्यथा मांडली. या गावात डांबरीकरण करून देण्याची मागणी येथील ग्रामस्थानी केली आहे.