झरी तालुक्यातील बेरोजगार युवक रोजगारासाठी न्यायीक लढाई लढणार
कुशल व अकुशल स्थानिक बेरोजगाराणा मुकूटबन परीसरात प्रत्येक कंपणीत रोजगाराची मागणी
बेरोजगार युवक आपल्या हक्कासाठी लढण्यास एकत्र.
Impact 24 news
तालुका प्रतिनिधी
पुरुषोत्तम गेडाम
यवतमाळ / झरी नामणी
झरी जामणी तालुक्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक हे आपल्या हक्कासाठी व्हाट्सउप आणि सोशल मीडिया याच्या माध्यमातून एकत्र येत मुकुटबन येथील बी.एस.इस्पात कोळसा खदान तसेच आरसीसीपील सिमेंट कँपनी प्रशासनाला स्थानिकाना ८०% रोजगार तसेच प्रकल्पग्रस्त युवकांना योग्यतेनुसार रोजगार देण्यासबधित तालुक्यातील ७० ते ८० युवकांनी एकत्र येत निवेदन देण्यात आले.निवेदनातील असणाऱ्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
तालुक्यातील मुकुटबन,भेंडाळा,मार्की, अर्धवन,पांढरकवडा,रुईकोट, अडेगाव,पिंपरड तसेच इतर काही गाव हे कोळसा खदान,डोलोमाईन्स,सिमेंट उधोग या उधोगमुळे प्रकल्पग्रस्त झाले आहे.मात्र तरी सुद्धा अनेक सुशिक्षित बेरोजगारांना हाताला काम नाही.स्थानिक युवक आहे म्हणून त्यांना नोकरी मध्ये समाविष्ट करण्यासाठी कंपणी प्रशासनाकडून वेळोवेळी दुर्लक्ष केले जाते.अनेक कंपणीमध्ये बिहार,उत्तर प्रदेश व इतर राज्यातील लोक काम करत आहे. झरी तालुक्यात आटीआय , इंजिनीअर,ऍग्री,बीएससी तसेच वाहन चालक परवाना असलेले युवक आहे.तरी सुद्धा स्थानिकांना प्राधान्य न देता इतर राज्यातील तसेच इतर जिह्लातील लोकांना प्राधान्य दिले जात आहे.तालुक्यातील सुशिक्षित युवक सद्या वैफल्यग्रस्त झाले आहे.त्यामुळे अनेक युवक हे गुन्हेगारी मार्गाने जाणार नाही ना ? अशी चर्चा सद्या नागरीकात रंगत आहे.
बेरोजगार युवकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी काही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नाही.पुढाकार घेतला तरी जवळील एक,दोन कार्यकर्ते कींवा व्यक्ततीला लावून मोकळे होतात.असे चित्र सद्या सुरू आहे. त्यामुळे मुकुटबन आसपास तसेच प्रकल्पग्रस्त गावातील युवक हे सोशल मीडिया च्या माध्यमातून एकत्र येत. आपला हक्काचा रोजगार मिळेपर्यत भारतीय संविधानिक मार्गाचा अवलंब करून लढणार असा निश्चय बेरोजगार युवकांनी केला आहे.
कंपनी प्रशासनाला दिलेले निवेदन हे पंतप्रधान,उधोग मंत्री आणि संबधित अधिकाऱ्यांना सुद्धा पाठवण्यात आले असून जर स्थानिक बेरोजगार युवकाना रोजगार न मिळाल्यास आणी मुकूटबन परीसरातील कंपनीनी यांची दखल न घेतल्यास बेरोजगार युवकाणी शासनाला आत्मदहन करण्याची परवानगी मागणार आहे,अशा प्रकारे निवेदन तालुक्यातील इतर उधोगाना देणार असे निवेदनकर्त्या बेरोजगार युवकांकडून सांगण्यात आले.