शरदराव पवार महाविद्यालय “नॅक(NAAC)- नवीन मूल्यांकन प्रणाली” यावर कार्यशाळा
प्रतिनिधी /प्रवीण मेश्राम
गडचांदूर- गडचांदूर येथील शरदराव पवार महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष(IQAC) विभागाच्या वतीने देशभरातील उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढीसाठी नामांकन देणाऱ्या नॅक या राष्ट्रीय संस्थेची नवीन मूल्यमापन प्रणाली या विषयावर शासनाच्या कोविड-19 नियमांचे पालन करून कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून रूब्रिकस प्रायवेट लिमिटेड चे संचालक आणि नॅक प्रणाली चे अभ्यासक आणि तज्ञ मार्गदर्शक डॉ.संचित नरवाडकर(पुणे) उपस्थित होते याप्रसंगी डॉ. नरवाडकर यांनी नॅक प्रणालीच्या नवीन घटकांची माहिती देऊन महाविद्यालयांनी गुणवत्ता वाढवण्यासाठी नेमके कोणते उपक्रम केले पाहिजे त्याचप्रमाणे नॅक या मूल्यमापन संस्थेला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी अभिप्रेत आहे याविषयी सविस्तर माहिती दिली.कार्यशाळेत डॉ.नरवाडकर यांनी नॅक मधील सात क्रायटेरिया व मार्किंग सिस्टम बद्दल अतिशय सुरेख माहिती दिलेली आहे या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या अनेक प्रश्न आणि शंकांचे त्यांनी निरसन केले.याप्रसंगी या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह यांनी केले तर संचालन व आभार महाविद्यालयच्या गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) चे समन्वयक डॉ.संजय गोरे यांनी केले.याप्रसंगी महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य लॉ कॉलेज चंद्रपूर चे डॉ.राव,डॉ. सरोज दत्ता.डॉ.हेमचंद दूधगवळी, डॉ.सुनील बडवाईक, डॉ. राजेश गायधनी, डॉ. शरद बेलोरकर,डॉ.माया मसराम,डॉ. सतेंद्र सिंह प्रा. मंगेश करंबे, शशांक नामेवार,विनोद उरकुडे,गुड्डू पांडे व इतर कर्मचारी उपस्थित होते…