राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या वतीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे केले स्वागत.

0
771

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या वतीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे केले स्वागत.

 

वर्धा येथे मेळाव्याला हिंगणघाट येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती.

 

हिंगणघाट (वर्धा):- अनंता वायसे तालुका प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता व मार्गदर्शन मेळाव्याला वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्कमंत्री तथा नगरविकास ऊर्जा,आदिवासी उच्च तंत्र शिक्षण विभाग,पुर्नवसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे वर्धा येथे आले असताना त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचेच्या वतीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हिंगणघाट येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

स्वागत करते वेळी गौरव तिमांडे, समुद्रपूर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नगरपरिषदचे गटनेता मधुकर कांबडी, प्रदीप डगवार अशोक डगवार,समुद्रपूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सौरभ साळवे, राष्ट्रवादी पदवीधर जिल्हा अध्यक्ष मनोज बुरीले,शहराध्यक्ष भूषण पिसे,हिंगणघाट राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेसचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष अमोल त्रिपाठी , विधार्थी शहर अध्यक्ष राहुल कोळसे,हिंगणघाट शहर उपाध्यक्ष युवराज माऊसकर, उपाध्यक्ष पवन काकडे , शहर अध्यक्ष शकील अल्पसंख्यांक महामंत्री मकसूद भावा रा.यु.काँचे सचिव विपुल थुल,भोला निखाडे, गणपत ईश्वर चंदनखेडे,हिंगणघाट तालुका अध्यक्ष नयन निखाडे,आकाश चाफले, अक्षय भगत,सचिव रितू मोघे ,सोशल मीडिया समन्वयक वैभव विनोद कांमडी,मधुकर कुटे, कुणाल हिवसे ,मोहित झाडे,हर्षल बुरीले, साहिल भुते, शशांक भगत, तेजस बुरीले, विवेक ठालाल, वेदांत नवणागे, प्रतीक समर्थ, हर्षल वरघणे,यश निखाडे,अनिकेत फुलजले, आदर्श गायकवाड, जय भोपले, तेजस खवशी तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पदादिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करते वेळी सांगितले की वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढली पाहिजे व संपर्क मंत्री या नात्याने येत्या काही दिवसात प्रत्येक तालुक्यातील बैठका लावून कार्यकर्त्यांचे तसेच जनतेचे जनता दरबार च्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करू जेणेकरून याचा पक्षाला सुद्धा नक्कीच फायदा होईल असे मार्गदर्शन करते वेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here