ग्रामीण पत्रकार संघ ता कोरपना च्यावतीने भ्याड हल्याच्या निषेधार्थ ठाणेदार साहेबांना निवेदन
कोरपना.प्रतिनिधी. प्रवीण मेश्राम
ग्रामीण पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष तथा ANI चे जिल्हा वार्ताहर “प्रकाश हांडे” यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत निवेदन सादर.
,१४ जुलै रोजी चंद्रपूर येथील गजबजलेल्या वरोरा नाका चौकात भर दिवसा दुपारच्या सुमारास एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष तथा ANI चे जिल्हा वार्ताहर “प्रकाश हांडे” यांनी हे सर्व दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मोबाईल काढला असता त्यावेळी मारहाण करणाऱ्या युवकांनी पत्रकार हांडे यांना थांबवित त्यांचा जवळील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.”आमचा व्हिडीओ जर व्हायरल झाला तर तुला कापून टाकेल” अशी धमकी देत तिथून निघून गेले.
चंद्रपूर शहरात गोळीबार प्रकरण ताजे असतांना पुन्हा अशाप्रकारे दिवसाढवळ्या भर चौकात कुणाला मारहाण करणे हे पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे करणारे आहे.सदर घटनेवरून असे लक्षात येते की आता पत्रकारही सुरक्षित नाही.कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघ या घटनेचा तिव्र निषेध करीत असून सदर आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी आपणास मागणी वजा विनंती आहे.आपण आमच्या मागणीवर सकारात्मक विचार करावा व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी व अशा गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याची सूचना पोलीस प्रशासनाला करावी तसेच शहरात वाढत असलेली गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढाल हीच अपेक्षा.ग्रामीण पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले..