हिंगणघाट ते कोरा डांबरीकरण रस्ता दुरुस्ती करा…!

0
1016

हिंगणघाट ते कोरा डांबरीकरण रस्ता दुरुस्ती करा…!

राष्ट्रवादी विद्यार्थी हिंगणघाट शहर अध्यक्ष राहुल कोळसे यांची राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदनातुन मागणी

हिंगणघाट (वर्धा), अनंता वायसे तालुका प्रतिनिधी

आज वर्धा इथे झालेल्या आढावा आणि मार्गदर्शन बैठकीत अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यात विद्यार्थांचा शैक्षणिक अडचणी लक्षात घेता माननीय. गौरव तिमांडे यांचा नेतृत्वात हिंगणघाट शहर अध्यक्ष राहुल कोळसे यांनी हिंगणघाट – नंदोरी – कोरा – चिमूर या रस्ता चे बद्दल निवेदन दिले.

हिंगणघाट – कोरा – चिमूर हा ग्रामीण भागातील एक महत्तवपूर्ण मार्ग आहे आणि त्यांचा साठी मुख्य मार्केट हे हिंगणघाट च आहे. बऱ्याच वर्षांपासून रस्ताचे नूतनीकरण होणार असे लोक प्रतिनिधी यांनी लोकांना आश्वासन देऊन तेथील शेतकरी आणि विद्यार्थांना प्रश्नाला वाऱ्यावर सोडले आहे. पावसाळा मध्ये तर त्याचे अजून हाल होतात जसे आपण खाली दिलेल्या फोटो मध्ये बघू शकता.

त्यात हिंगणघाट – नंदोरी रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले असून ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. रस्ता मध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे समजत नाही!
या रस्ता वर जड वाहनं खूप आहे आणि हा रस्ता अरुंद असून आता पावसाळा मध्ये हा रस्ता खड्डामय झाला आहे. तरी राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे साहेबांना याबद्दल निवेदन देऊन त्यांना या समस्या मांडल्या. आणि साहेबांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल याची ग्वाही दिली.

त्यावैल त्यांचा सोबत हिंगणघाट विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष अमोल त्रिपाठी, शहर अध्यक्ष शकील अहमद, रा.यु.काँचे सचिव विपुल थुल, हिंगणघाट तालुका अध्यक्ष नयन निखाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस समुद्रपुर तालुका अध्यक्ष सौरभ साळवे, हिंगणघाट शहर उपाध्यक्ष युवराज माऊसकर, उपाध्यक्ष पवन काकडे, सचिव रितू मोघे, सोशल मीडिया समन्वयक वैभव मानकर आदी मंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here