भिसी नगर पंचायत ची तात्काळ घोषणा करा – टायगर गृप ची मागणी

0
660

भिसी नगर पंचायत ची तात्काळ घोषणा करा – टायगर गृप ची मागणी

तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

चिमूर (चंद्रपूर), आशिष गजभिये तालुका प्रतिनिधी

मागील अनेक महीण्यांपासुन रखडलेली भिसी नगर पंचायत निर्मीतीची प्रक्रीया पूर्ण करून तात्काळ भिसी नगर पंचायत घोषीत करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र टायगर गृप शाखा भिसी च्या वतीने करण्यात आली आहे.१५ सप्टेंबर २०२० ला भिसी ग्राम पंचायत च्या कमेटीचा कार्यकाळ संपला. त्यावेळी कोरोणाची पहीली लाट राज्यासह देशात धूमाकूळ घालत होती. कोरोणा महामारीमुळे सार्वत्रीक निवळणूका रद्द करण्यात आल्या होत्या. चार महीण्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये ग्रामपंचायत निवळणूकीची घोषना झाली. त्या आधी २९ डिसेंबर २०२० ला भिसी ग्राम पंचायतीचे रुपांतर नगर पंचायत मध्ये करण्याची अधीसुचना निघाली होती. त्या अधीसुचनेचा विचार करून ग्रामपंचायत निवळणूकीत उभे असलेले ६६ पैकी ६५ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले व भिसी नगर पंचायत निर्मीतीला आपला पाठींबा दर्शविला. २९ डिसेंबर ला राज्यतिल एकून ११ नगर पंचायत निर्मीतीच्या अधीसुचना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी फक्त पूणे जिल्ह्यातील मारेगांव ही एकमेव नगर पंचायत घोषीत करण्यात आली. त्यावेळी भिसी नगर पंचायत निर्मीतीकडे शासनाने दुर्लक्ष केले.
भिसी मध्ये मागील १० महीण्यांपासून प्रशासकीय अधीकाऱ्याकडे गावाची धुरा आहे. गावात अनेक समस्यांनी घर केले आहे. तसेच गावाचा विकास सुद्धा खुंटला आहे. त्यामुळे मागील सहा महीण्यांपासुन भिसी नगर पंचायत निर्मीतीचे रखडलेले प्रशाकीय निकष पूर्ण करून तात्काळ भिसी नगर पंचायत ची घोषना करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र टायगर गृप शाखा भिसी ने केली आहे.
तसेच या मागणीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना चिमूर चे तहसीलदारामार्फत देण्यात आले. सोबतच ग्रामविकास मंत्रालय, नगरविकास मंत्रालय, महसुल विभाग, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किर्ती कुमार भांगडीया तसेच चंद्रपूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. तहसीलदार चिमूर यांना निवेदन देते वेळी महाराष्ट्र टायगर गृप चे शाखा प्रमुख अक्षय नागपुरे, शाखा उपप्रमुख शैलेश आजवनकर, सदस्य अंकीत बानकर, शैलेश बावणे, कुंथल श्रीरामे उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here