बामणीत बिबट्याच्या हमल्यात ईसम जखमी, कोठारी वनक्षेत्रातील घटना 

0
774

बामणीत बिबट्याच्या हमल्यात ईसम जखमी, कोठारी वनक्षेत्रातील घटना 

बल्लारपूर तालुका प्रतिनिधी :- राज जुनघरे

कोठारी वनक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या नियत क्षेत्रातील बामणी ( काटवली) येथिल मनोहर बुधा मडावी या इसमावर बिबट्याने हमला करून गंभीरपणे जखमी केल्याची घटना घडली असुन नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.
कोठारी पासुन अवघ्या तीन कि.मी. अंतरावर असलेल्या बामणी ( काटवली ) क्षेत्रात वाघ व बिबट्या चा संचार वाढला असुन गावात तसेच शेतशिवारात हिंस्त्र वन्यप्राण्यांचे नागरिकांना दर्शन होऊ लागले आहे. तशातच सोमवार १२ जुलै च्या रात्री ९.०० वाजताचे दरम्यान गाव शांत झाला असता बिबट गावात शिरून मनोहर बुधा मडावी यांच्या घरातील कोबळ्यांवर ताव मारण्याचा प्रयत्न केला. मात्र झाप्यात बंदिस्त असलेल्या कोंबड्यांच्या जडफळाटाचा आवाज ऐकून मनोहर काय झाले म्हणून पाहण्याकरिता गेला. त्याचवेळी कोंबळ्यांवर झडप घेणा-या बिबट्याने मनोहर वर झडप घेतली आणि त्याला जखमी केले. गावातील घटना असल्याने, आरडाओरड केल्याने लगेच गावकरी धावून आले. व बिबट्यास हुसकावून लावले. यामुळे मोठा अनर्थ टळला. यात मनोहर बुधा मडावी वय ५५ वर्षे यास गंभीर दुखापत झाली असुन घटनेची सुचना वनक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांना देण्यात आली. जखमीस तातकाळ आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. व वैद्यकीय अधिकार्याच्या सुचनेनुसार चंद्रपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. पुढील तपास क्षेत्रीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक सचिन टेकाम, अतिशिग्र दलाचे वनरक्षक सुनील नगारे व वनमजूर नामदेव काळे करित आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून परत घटना घळू नये म्हणून वनविभागाच्या वतीने गस्त वाढविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here