संगमनेर मध्ये शिवसेना संपर्क अभियान राबविण्यात सुरवात…
मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ.
विशेष प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर गायकर पाटील.
संगमनेर:- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून आणि संस्कारातून पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ काल १३ जून रोजी संगमनेर तालुक्यात करण्यात आला.
अभियानाची सुरुवात मा.ना.शंकरराव गडाख,खासदार मा.सदाशिवराव लोखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख पै.रावसाहेब खेवरे नाना , अकोले शिवसेना प्रमुख मच्छिंद्र धुमाळ , नितीन नाईकवाडी व संगमनेर शहर तसेच तालुक्यातील सर्व शिवसेना व शिवसेनेच्या अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी, पंचायत समिती व सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्य व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आली.
शिवसंपर्क अभियान हे “शिवसेना प्रत्येक घराघरांत व मनामनात”, रुजविण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी असून शिवसैनिकांनी संकटाच्या काळात प्रत्येक घराघरात जाऊन जनतेच्या अडचणी सोडवत पक्षासाठी काम करण्याचे आवाहन या वेळी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. शिवसेनेची स्थापना मुख्यतः स्थानिक नागरिकांचे हक्क अबाधित राखण्या साठी झाली आहे. गोर गरीब जनता कायम शिवसेनेचे मतदार राहिलेत. राज्यात तिन्ही पक्षाचे माहविकास आघाडी सरकार आहे, सरकार चांगले काम करत आहे, सरकारचा विकास कार्यक्रम जनते समोर मांडण्याचे काम शिवसैनिकांनी करावे असे ते म्हणाले. या वेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. खासदार सदाशिव लोखंडे यांनी विशेष योजनाचा व मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेतला, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी अभियान यशस्वी करू असा आत्मविश्वास व्यक्त केला.अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . सर्वच शिवसैनिकांनी मोठी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केेल..