इंधन दरवाढी विरोद्धात युवक काँग्रेसने आरंभिले स्वाक्षरी अभियान
गडचिरोली /सुखसागर झाडे
गडचिरोली: इंधन दरवाढी बरोबर अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव देशभरात गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करित आहे. काँग्रेसच्या वतीने आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आले. तरीही झोपलेल्या केंद्र सरकारला जाग आली नाही. दिवसेंदिवस अधिकच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यात यावे. याकरिता जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल पंपा समोर स्वाक्षरी अभियान राबवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवडे यांनी केले.
मागील काही महिन्यांपासून देशात सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहे. इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल व डिझेलचे दर शतक पार केले आहे. याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला. त्यामुळे अनेक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. यातच महागाई वाढली असल्याने सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. डिझेल, पेट्रोल दरवाढीमुळे दळणवळणाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. याचा निषेध म्हणून रविवारी (11जुलै) जिल्हा मुख्यालयातील चंद्रपूर मार्गावरील पेट्रोल पंप समोर स्वाक्षरी अभियान राबवून केंद्र सरकारचा निषेध केला.
या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरूद्ध घोषणाबाजी करत त्वरित दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली. या आंदोलनात महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष, सतीश विधाते शहर काँग्रेस अध्यक्ष ,जिल्हा युवक काँग्रेस निरीक्षक केतन रेवतकर,प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अतुल मल्लेलवार, रजनीकांत मोटघरे अध्यक्षअनुसूचित जाती विभाग,भावना ताई वानखेडे अध्यक्ष महिला काँग्रेस,नंदू वाईलकर महाराष्ट्र प्रदेश सचिव सोशल मिडिया , नितेश राठोड, संजय चन्ने,प्रतिक बारसिंगे,तोफिक शेख,घनश्याम मुरवतकर ,गौरव अलाम,हरबाजी मोरे,हेमंत भाडेकर,पंकज बारसिंगे,आशिष कामडी,विपूल येलेंट्टीवार,निखिल खोब्रागडे,माजी नगरसेविका लता मुरकुटे, माजी नगरसेविका पुष्पा कुमरे,पौर्णिमा ताई भडके, सुवर्णा उराडे, नीला निदेकर, नीताताई वाडडेट्टीवार,स्मिता संतोषवार,वर्षा गुलदेवकर,आरती कंगाले,फातिमा पठाण,कुणाल ताजने,योगेश नैताम,मयूर गावतुरे,खुशाल कुंभारे,रोहित निकुरे,तुषार सोनूले,निव्या कुंभारे, समीर ताजने,कमलेश खोब्रागडे,शिवम ओदेलवार सह युवक काँग्रेस,शहर काँग्रेस,महिला काँग्रेस ,अनुसूचित जाती विभाग,सेवादल,एन एस यु आय, सोशल मीडिया पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.