सर्पमित्रांनी दिले नाग सापास जीवदान
चेतन – रतन या दोघां भावांची १० वर्षांपासून सेवा
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी :- राज जुनघरे
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथिल चेतन – रतन हे दोघे भाऊ मागिल दहा वर्षांपासून सर्पमित्र म्हणून नागरिकांना निस्वार्थ पणे सेवा देत आहेत. स्थानिक नागरिकांच्या घरात निघालेले साप पकडून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने त्यांना जंगलात सोडण्याचा उपक्रम हे दोघे भाऊ नित्यनेमाने राबवित आहेत. यामुळे चेनन -.रतन यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
स्थानिक विनोद बुटले व जावलिकर यांचे घरी व घरपरिसरात नाग सापांचे वास्तव्य असल्याची माहिती मिळताच ही दोन्ही भावंडे जावून आपल्या शिताफीने एक-एक करून दोन्ही जहाल विषारी नाग सापांना जाईबंद केले. याची माहिती वनविभागाला देऊन त्यांच्या मदतीने जंगलात सोडून देण्यात आले.
कोठारी येथील चेतन वासनिक व रतन वासनिक हे दोघे भाऊ मागिल दहा वर्षांपासून कोठारी व परिसरातील नागरिकांच्या माहिती वरून सापांना जीवदान देत आहेत. आजतागायत नाग,घोनस, मन्यार, धामन, वेल्या, अजगर, कवळ्या आणि अशा अनेक जातींच्या हजारांच्या वर सापांना जीवदान दिले आहे. घरात किंवा घराच्या आवारात, शेतात सापांचे वास्तव्य आढळून येते. मात्र दहशती मुळे नागरीक सापांना जिवानिशी मारण्याचे प्रकार घडत असतात. परंतू या दोन्ही भावंडांच्या उपक्रम शीलते मुळे सापांना जीवदान मिळू लागले आहे.
सर्पमित्रांना वनविभागा कडून मदतिची गरज |
निस्वार्थ पणे सापांना जीवदान देवुन कशाचीही अपेक्षा न करता स्वता जीव धोक्यात घालून सेवा देनार्या सर्पमित्रांना वनविभागाच्या माध्यमातून संरक्षण विमा, साप पकडण्यासाठी लागणारे साहित्य,उपकरण, व मानधन देण्याची आवश्यकता आहे.