राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या हिंगणघाट तालुका अध्यक्षपदी नयन निखाडे यांची नियुक्ती.

0
721

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या हिंगणघाट तालुका अध्यक्षपदी नयन निखाडे यांची नियुक्ती.

 

नयन निखाडे सह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

 

हिंगणघाट/अनंता वायसे तालुका प्रतिनिधी

 

 

        राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या हिंगणघाट तालुका अध्यक्षपदी नयन निखाडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच गौरव तिमांडे यांच्या वतीने नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व सामाजिक आणि राजकीय भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

ही नियुक्ती माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या मार्गदर्शना खाली व नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच विद्यार्थी व सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष बळकटीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत राहील असे प्रतिपादन नवनियुक्त तालुका अध्यक्ष नयन निखाडे यांनी आपल्या निवडीनंतर केले.

पक्षाच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येयधोरणानुसार राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर देत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरद पवार यांचे विचार समाजातील सामान्य घटकापर्यंत पोचविण्यासाठी कार्यरत राहाल तसेच माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्षवाडी सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून काम करेल असा विश्वास व्यक्त करत नयन निखाडे यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अमोल त्रिपाठी, शहराध्यक्ष राहुल कोळसे, उपाध्यक्ष पवन काकडे, उपाध्यक्ष युवराज माऊसकर, कुणाल हिवसे ,मोहित झाडे,हर्षल बुरीले, साहिल भुते, शशांक भगत, तेजस बुरीले, विवेक ठालाल, वेदांत नवणागे, प्रतीक समर्थ, हर्षल वरघणे,यश निखाडे,अनिकेत फुलजले, आदर्श गायकवाड, जय भोपले, तेजस खवशी इत्यादी उपस्थित होते.

तसेच या निवडीबद्दल माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत,रा.काँचे प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, प्रदेश सरचिटणीस दिवाकर गमे, रा.यु. कॉं प्रदेश सचिव स्वराज शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे,रा.वि. काँचे जिल्हाध्यक्ष सुरज देवळीकर, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, शहराध्यक्ष भूषण पिसे,रायुकाँ शहराध्यक्ष शकील अहमद इत्यादींचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here