प्रलंबित व इत्तर वनहक्क दावेदारांच्या शेतींवर वाहिती करण्यांस वनविभागाची मनाई ?
माराेड्याचे अनेक कास्तकार धडकले चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात
चंद्रपूर (विदर्भ), किरण घाटे विशेष प्रतिनिधी (९ जुलै) : वर्षांनुवर्ष अतिक्रमणची शेती वाहुन आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह करणाऱ्या अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना यावर्षी अतिक्रमणची शेती कसत असतांना बरीच तारेवरची कसरत करुन अनेक संकटांना ताेंड देण्याची वेळ आली आहे. सध्या सर्वत्र शेती हंगामाचे दिवस सुरु असुन प्रत्येक कास्तकार शेती कामात व्यस्त झाला आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसील अंतर्गत येणाऱ्या माराेडा येथील अतिक्रमण धारक शेतकरी अतिक्रमणची शेती करीत असतांना वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यांना त्रास देत असल्याचे एकंदरीत दिसून येते.आज चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ता अकबरभाई पठाण यांचे नेतृत्वाखाली मूल तालुक्यातील अनेक अतिक्रमण धारकांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांची भेट घेवून त्यांचे समाेर आपली व्य़था मांडली. प्रलंबित व इत्तर वनहक्क दावेदारांच्या शेतांवर वनविभागाच्या कार्यवाया स्थगित ठेवण्याबाबत त्यांनी एक लेखी निवेदन सुध्दा यावेळी सादर केले. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना चंद्रपूरचे अकबरभाई पठाण, माराेड्याचे सरपंच भिकारु पांडुरंग शेंडे, अनिता वसाके, वेणूताई बाेरुले, माेहिनी निमगडे, राखी मेश्राम, गजानन गुरनुले, श्रावण ठाकरे, श्रीरंग गुरनुले, वनिता पाेशेट्टीवार यांचे सह अनेक अतिक्रमण धारक शेतकरी उपस्थित हाेते.