नगर प्रशासन आणि वेकोली अधिकाऱ्यांना जागवण्यासाठी युवक काँगेसचा भर पावसात बैठा सत्याग्रह…

0
683

नगर प्रशासन आणि वेकोली अधिकाऱ्यांना जागवण्यासाठी युवक काँगेसचा भर पावसात बैठा सत्याग्रह…

बल्लारपूर तालुका प्रतिनिधी : राज जुनघरे

चंद्रपूर पालिका प्रशासन आणि वेकोलीच्या सीमा वादात भरडलेला कॉलरी परिसरातील भगत सिंह, सरदार पटेल वार्डाला जोडणारा तीळक वार्डातील मुख्य रोड अनेक वर्षांपासून विकास कामांच्या प्रतीक्षेत असून, नगरसेवकांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि पालिका प्रशासनाच्या नियोजन शून्यते मुळे अश्रू वाहत असतांना वेकोली अधिकाऱ्यांनी आपल्या शब्दावरून फिरवलेली पाठ, येथील रोडच्या जीवघेण्या खड्यांना कारणीभूत ठरत आहे.
आजवर युवक काँग्रेस ने या रोडच्या सुधारणे बाबत,वार्डाच्या विकासा बाबत अनेक आंदोलने केलीत,मात्र कुणाच्या बुडाला घाम फुटला नाही.फक्त आश्वासनांचा मांडव टाकण्यात आला.त्यामुळे युवक काँग्रेस ने भर पावसात रोडवरील खड्यातील पाण्यात बैठा सत्याग्रह करून वेकोली आणि नगर प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जो पर्यंत रोडच्या दुरुस्तीला सुरुवात होत नाही,वार्डातील विकासकामे होत नाही,तोपर्यंत लक्षवेधी आंदोलन सुरूच राहील;असा इशारा युवक काँग्रेसचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम यांनी दिला आहे.
या आंदोलनात विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम यांच्या सह सुनील मोतीलाल, रूपेश रामटेके, दिलिप निर्मल, शशी कोटेवार, प्रशांत सग्गा, किष्णा नामस्वामी, श्रिकांत गुजरकर, संदिप नक्षिने ,राजु सुखदेवे, देवेंद्र थापा, अमोल तुमसरे, प्रतिक घुगरूळकर, कमल केशकर, फईम शेख, गणेश पेरका, प्रज्वल पुरी, कटरणाजी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here