दालमिया सिमेंट कामगारांचे आंदोलनामुळे तीन दिवसापासून उत्पादन ठप्प.
कोरपना /प्रतिनिधी. प्रवीण मेश्राम
आज गुरुवारला आठ तारीख जुलै रोजी उपोषणाला तिसरा दिवस उजाडला आहेत या आंदोलनाला अनेक कामगार संघटना पाठिंबा देत असून आंदोलन चिघळण्याची चित्र पाहावयास मिळत आहेत.
नारंडा येथील दालमिया भारत सिमेंट उद्योगाचे प्रकल्प कारण मी झाले आहे .यापूर्वी या ठिकाणी मुरली सिमेंट उद्योग मध्ये नऊशे ते हजार कामगार कामावर होते .2015 पर्यंत काम केलेल्या कामगारांना थकित कामाचा मोबदला मिळाला नव्हता याकरिता कामगार संघटनेने सातत्याने पाठपुरावा करून थकीत देयके मिळण्याची मागणी केली होती दालमिया व्यवस्थापनाने थकीत देयके देण्याचे आश्वासन दिले होते मात्र हा प्रकल्प कार्यान्वित होऊ नये देयके न मिळाल्याने कामगारांमध्ये असंतोषाची ठिणगी पडली तसेच 26 शेत जमीन प्रकल्प धारक कंत्राटी कामगार व कायमस्वरूपी कामगार कार्यरत होते .मात्र कंपनी प्रकल्पाच्या कामाची उभारणी करत असताना कंत्राटदार मार्फत सुरू असलेल्या कामावर परप्रांतीय बाहेरचे मजूर कामावर घेत स्थानिक मजुरांना डावलण्याचा प्रयत्न करीत असल्याने स्थानिक मजुरांमध्ये असंतोष वाढले परिणाम तीव्र आंदोलन उभारून कामावर न जाण्याचा निर्णय कामगार संघटनेने घेतला होता तीन दिवसांपासून कामकाज ठप्प पडल्याने आज अखेर कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी व कामगार संघटनेचे मनोज भटकर .प्रफुल घाडगे .वैभव मोहरले .संतोष संकुलवार. पंढरी पोटदुखे .यांचेसह चर्चा करून पुढील सात दिवसापर्यंत कंपनी व्यवस्थापनाला वेळ द्यावा सध्या कामावर असलेल्या मजुरांना कामावर येण्यास मनाई करू नये सुरू असलेले काम मजुरांना करू द्यावी पुढील सात दिवसात कामगाराच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ मात्र सात दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर कामगार एकवटून कंपनीच्या धोरणाचा निषेध म्हणून आंदोलन सुरू ठेवेल या ठिकाणी कामगारांना सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक कीट पुरवठा केला .जात नाही मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या पूर्वी अपघाताच्या घटना घडल्या आहे पुढे असा प्रकार घडू नये यासाठी कंपनीने आवश्यक ती सुरक्षेची सर्व उपाययोजना करावी व कामगारांचा प्रश्न एक आठवड्यात निकाली निघाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपस्थित कामगार पदाधिकाऱ्यांनी चर्चेतून दिला स्थानिक कामगारांचा मागण्या व पूर्वीच्या कामगारांना पूर्ववत कामावर घेतल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही असा इशारा देण्यात आला आहे .देण्यात आला आहे.