शेतकऱ्यांना शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी केले मोलाचे मार्गदर्शन
प्रतिनिधी✍️सुखसागर झाडे
गडचिरोली: अहेरी तालुक्यातील येलचिल येथे पोलीस मदत केंद्र यांच्या विधमाने दि. ७जुलै रोज बुधवार ला भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर मेळाव्यात बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामीण भागातील राहणाऱ्या आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांबाबत अपरिचित असलेल्या लोकांपर्यंत विविध विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली गेली. या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
या मेळाव्यात शेतकरी बांधवांना शेती उत्पादनास उपयुक्त आवश्यक बि-बियानांचे वाटप करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी कांबडे शेतीविषयक विविध योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने शेती करुन आपलं उत्पादन कसं वाढवता येईल या बाबत मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याचं प्रमाणे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचे यांच्या अंतर्गत कसा रोजगार मिळून कसा आपला आर्थिक विकास साध्य करता येतो. याबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. तद्वतच पशुनां जंतनाशक लस दिली तर विविध पशुंची तपासणी करून औषधोपचार केला. त्याचप्रमाणे विविध विभागातील अधिकाऱ्यांनी अनेक योजनांची माहिती देत शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेत निराकरण करीत संवाद साधला. यावेळेस मंचावर जगताप (PSI) पोलिस मदत केंद्र,येलचिल ,याकुबअली (SI)CRPF , कांबडे (तालुका कृषी अधिकारी)अहेरी , खरात (मंडळ कृषी अधिकारी) अहेरी. डॉ.सिध्दार्थ म.डोंगरे (सहायक पशुधनविकास अधिकारी)फिरते पशु चिकित्सालयआलापल्ली,शेख (तलाठी ) किशोरजी आत्राम (सरपंच ) ग्राम पंचायत येलचिल बंडावार (ग्रामसेवक)ग्रामपंचायत येलचिल, अनिल राठोड (फिरते पशुचिकित्सालय आलापल्ली) अर्चना दुधे/मनिषा जंबेवार(उद्योग विकास)सखी, आलापल्ली व येलचिल परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी वर्ग तथा इतरत्र विभागातील कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेत मदत केली.