एरंडोल येथे शांतता समितीच्या बैठकीत `एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्याचा केला निर्धार……  

0
800

एरंडोल येथे शांतता समितीच्या बैठकीत `एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्याचा केला निर्धार……

 

जिल्हा प्रतिनिधी/प्रमोद चौधरी

जळगाव/ एरंडोल:-  येथे सोमवारी ५ जून २१ रोजी एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे शांतता समितीच्या सदस्यांची व शहरातील, सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होणारे नोंदणीकृत मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवून यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर शहरातून एकच गणपती बसवावा असे आवाहन केले त्याबाबत सविस्तर चर्चा होऊन शहरातील पांडव वाडा मित्र मंडळ व सर्वोदय गणेश मंडळ हे दोन मंडळ वगळता या उपक्रमाला बाकी सर्वांनी प्रतिसाद देण्याचे जाहीर केले तसेच या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सदर उपक्रम राबविल्यास आपल्या वर्षानुवर्ष स्मरणात राहील असे सांगितले.तसेच या उपक्रमा प्रसंगी विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्याचे आवाहन करुन कोरोना मुळे काळजी घेण्याचे देखील आवाहन करण्यात आले.विजय महाजन यांनी उपक्रमाला सहकार्य करतांना मागील काही वर्षांपूर्वी गणपती काळात काही मंडळांच्या कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते ते मागे घ्यावे व सदर उपक्रम फक्त कोरोना काळापुरताच असावा असे लेखी आश्वासन द्यावे असे सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी मुख्याधिकारी किरण देशमुख,माजीनगराध्यक्ष देविदास महाजन,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,माजी नगरसेवक जगदीश ठाकुर,संपादक प्रा.शिवाजीराव अहिरराव,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,उपनगराध्यक्ष अभिजित पाटील,शालिकग्राम गायकवाड,आर.डी.पाटील,मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार,नगरसेवक नितीन चौधरी असलम पिंजारी,अतुल महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,प्रमोद महाजन,प्रकाश चौधरी,माजी नगरसेवक सुनील चौधरी,मोहन चव्हाण,संजय पाटील,सचिन महाजन,सुनील मराठे,दशरथ चौधरी, परेश बिर्ला,नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी,पोलीस कर्मचारी अकील मुजावर,पंकज पाटील, राजेश पाटील आदी उपस्थित होते.प्रास्ताविक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.सूत्रसंचालन साहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी केले.आभार प्रदर्शन संदीप सातपुते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here