वाढत्या महागाईच्या विरोधात यंग चांदा ब्रिगेडचे चंद्रपूरातील गांधी चौकात जनआक्रोश आंदोलन
केंद्र सरकार विरोधात नारेबाजी, जिवनावश्यक वस्तुंची दरवाढ मागे घेण्याची केली मागणी
चंद्रपूर, किरण घाटे – विशेष प्रतिनिधी
गॅस सिंलेडर, पेट्रोल – डिझेल व जिवनावश्यक वस्तुंच्या दरवाढी विरोधात आज मंगळवार दि. ६जूलैला यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जाेरदार घोषणाबाजी करत शहरातील स्थानिक गांधी चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यांत आले .यावेळी यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, सायली येरणे, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, कल्पना शिंदे, रुपा परसराम, कविता शुक्ला, अनिता झाडे, शमा काझी, अल्का मेश्राम, दुर्गा वैरागडे, कौसर खान, शांता धांडे, वैशाली मेश्राम, विजया बच्छाव, आशा देशमूख, वैशाली रामटेके, विमल कातकर आदिंची उपस्थिती होती.
अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांनी फसवणूक केली असून या सरकारच्या काळात खाद्य तेल, पेट्रोल – डिझेल, गॅस सिंलेडर व जिवनावश्यक वस्तुंच्या दराने आजवरचे सारेच विक्रम मोडून महागाईचा उच्चांक गाठला आहे. त्यामूळे हेच का ते अच्छे दिन असा प्रश्न नागरिक उपस्थित करित आहे. वाढलेली ही दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी असून जनतेची आर्थिक लुट करणारी आहे. आज सगळ्याच वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. बाजारातील अन्नधान्य, भाजीपाला, खाद्य तेल, फळभाज्या इत्यादी सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत दिवसागणिक भरमसाठ वाढ होत आहे. मागील काळात पाच राज्यात झालेल्या निवडणुकानंतर देशात पेट्रोल, डिझेल व एल .पी .जी .गॅसच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल आजच्या घडीला १०० रुपयांच्या वर तर डिझेल सुद्धा शंभरीच्या घरात पोहचले आहे. घरगुती गॅस सुद्धा ९०० रुपयाच्या जवळ पोहचला आहे. मागील दोन वर्षाच्या काळात कोरोना महामारीमुळे आधीच मध्यमवर्गीय, गरिबांच्या रोजगारावर गदा आली आहे. रोजगारच्या अभावात वाढलेल्या या महागाईमुळे संपूर्ण देशात दारिद्रय सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असतांना देशातील केंद्रसरकार बघ्याची भूमिका घेऊन जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहे. त्यामूळे पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, इंधन दरवाढ महागाई बेरोजगारी विरोधात यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने आज हे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हातात गॅस सिलेंडरचे प्रतिकात्मक फलक घेवून जैन भवन ते गांधी चौक असा मोर्चा काढत नारेबाजी केली. यावेळी गांधी चौकात या दरवाढी विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला सर्व सामान्यांचा जिवावर उठलेली ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला करण्यात आली. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक, कलाकार मल्लारप, जितेश कुळमेथे, विलास वनकर, विश्वजीत शाहा, अजय दुर्गे, सलिम शेख, आनंद रणशूर, हरमन जोसेफ, विनोद अनंतवार, आनंद इंगळे, गौरव जोरगेवार, अबरार सय्यद, चंद्रशेखर देशमुख आदिंनी परिश्रम घेतले सदरहु आंदोलनात यंग चांदा ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षनिय होती.