ना. बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिवस रुग्णमित्र गजू कुबडे यांनी साजरा केला मनोरुग्णासोबत
हिंगणघाट, अनंता वायसे तालुका प्रतिनिधी
जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेचि जाणावा ।।
असं जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगून गेले.आणि त्या संतांनी सांगितलेले विचार प्रत्यक्षात आचरणात आणत त्या नुसार रंजल्या- गाजल्यांच्या जीवनात थोडे हास्य फुलविण्यासाठी शेतकरी नेते अपंगांचे कैवारी नामदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवसाचे निमित्त साधून येथील रुग्णमित्र गजू कुबडे या अवलियानेही बच्चूभाऊच्या जन्मदिनी स्वतःचे बॅनर पोष्टर न लावून कोणतीही जाहिरातबाजी न करता मनोरुग्णा सोबत संपूर्ण दिवस घालवून त्यांच्या असहाय जीवनात थोडे हास्य निर्माण करून संत तुकारामाच्या अभंगातील ओळी सार्थ करण्याचा प्रयन्त केला.
जाम येथील चंद्रपूर रोड वरील मनोरुग्णासाठी प्रसिद्ध असलेले जाम येथील चावरा आश्रम येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख व वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र- गजु कुबडे व सहकाऱ्यांनी ५४ मनोरुग्णा सोबत अनोख्या पद्धतीने साजरा केला.
संपूर्ण दिवस या ५४ मनोरुग्णासोबत घालवून गजू कुबडे व त्यांच्या सहकारी यांनी एक वेगळाच आदर्श प्रस्थापित केला. यावेळी आश्रम येथील सर्व मनोरुग्णाना नवीन कपडे वाटप करण्यात आले.व या मनोरुग्णाना सन्मानाने ताट-वाटीने पंगत करून भोजनदान करण्यात आले. यावेळी मनोरुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून आली.या प्रसंगी जाम येथील उपसरपंच व प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजय खेडेकर, हिंगणघाट तालुका प्रमुख जगदीश तेलहांडे,प्रहारचे वर्धा जिल्हा रुग्णसेवक विनोद खंडाळकर,सिंदी(रेल्वे) शहर प्रमुख सुरज अष्टनकर,सेलू तालुका उपाध्यक्ष नितेश भोमले, हमदापुर शाखा प्रमुख उमेश तामगिरे,समुद्रपूर युवा सेनेचे तालुका प्रमुख अभिलाष गिरडकर,राहुलभाऊ पाटील, सुराज कुबडे,प्रहार सेवक राजेश लखाणी,भूषण जिकार, मोहन पेरकुंडे, सतीश गलांडे, वैभव मुंडले, सागर आत्राम, तुषार उरकांदे, अक्षय पुनवटकर इत्यादी प्रहार सेवक उपस्थित होते.