नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याण आयुक्तांना रमाई आवास योजनेतील अनुदानांसाठी लाभार्थ्यांचे निवेदन सादर !
उस्मानाबाद किरण घाटे
वि .प्र. शहरातील रमाई आवास योजनेतील मंजुरी दिलेल्या ३४६ व तिसऱ्या हप्त्यातील २९ अश्या लाभाच्या हप्त्यासाठी लाभार्थी यांनी समाज कल्याण आयुक्त , जिल्हाधिकारी,मुख्याधिकारी यांना १४६ जणांच्या सह्यानिशी लेखी निवेदन दिले.रमाई आवास योजनेतील लाभार्थी यांना लाभ देण्यात आले परंतु अर्धवट कामामुळे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थी ऊन ,पाऊस ,वारा या परिस्थितीला तोंड देत घरकुल पुर्ण होण्यासाठी धडपडत आहेत पावसाचे दिवस असल्याने राहावे. कुठे असा प्रश्न त्यांचे समाेर निर्माण झाला असून कोरोना लाॅकडाऊन मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.नविन ३४६ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी देऊन त्यांचे बॅंक खाते उघडले असुन त्यांच्या खात्यावर आणखी रक्कम जमा झाली नाही. घरकुलाचे अनुदान येत्या आठ दिवसांत न मिळाल्यास आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा इशारा दि.५जूलैला देण्यांत आला .या वेळी नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली एक लेखी निवेदन देण्यात आले .निवेदन देतांना प्रामुख्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंगुलभाऊ बनसोडे, नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,गट नेते नगर सेवक गणेश खोचरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता पेठे,नगर सेवक बापू पवार, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, युवा नेते मृत्युंजय बनसोडे,अशोक पेठे, असंघटित कामगार संघटनेचे संजय गजधने,हिमालय बनसोडे, सचिन धाकतोडे, सचिन वाघमारे,सचिन देडे,स्वराज जानराव यांचा सह अनेक लाभार्थ्यांचा समावेश हाेता सिध्दार्थ बनसोडे व दत्ता पेठे यांनी घरकुल साठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या वेळी केली .