दारू चालू होताच मध्य प्रेमींच्या आनंद गग्नाला मावेनासा झाला
गडचांदूर प्रतिनिधी – प्रवीण मेश्राम
पाच ते सहा वर्षापासुन चंद्रपुर जिल्हयात संपुर्णपणे दारूबंदी करण्यांत आली होती पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पुन्हां दारू चालू करण्याची घोषाणा काही दिवसांपूर्वी करण्यांत आली होती मात्र आज गडचांदुर शहरातील दारू दूकान सुरू झाली असता तळीरामानी एकच गर्दी केली .
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यांत आली होती मात्र नावालाच दारूबंदी होती आणि जिल्हयात सर्वत्र मुबलक दारू मिळत होती फरक एवढाच होता की अवैधरित्या दारू विक्रेते काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवाच्या सवा भावात विक्रि करून रगड पैसा कमावून बसले असतील पण आज पासून दारू विक्री सुरू झाल्यामुळें अवैध दारू विक्रेते आणि कांहीं भ्रष्ट अधिकाऱ्यांचा हिरमोड झाल्याचे बोलिले जात आहेत.
जशी आज पासून दारू विक्री सुरू झाली तसे पाच ते सहा वर्षापासुन दिडशे ते दोनशें रुपयाला मिळणारा देशी दारूचा पव्वा सत्तर रूपयाला मिळत असल्यामुळें एक एक तळीराम चार तें पाच दारूचे पव्वे घेवून जाताना दिसत असून आजूबाजूच्या गावखेड्यातील तळीरानी एकच गर्दी केली आहे त्यामुळे कोरोना महामारी आहे की नाही असे मागील शहरात दिसत आहे.