चोवीस तासांत टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू

0
730

चोवीस तासांत टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू

सिंधुताई जाधव व रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिला होता मुर्दा आंदोलनाचा इशारा

जिवती/प्रतिनिधी : आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले टेकामांडवा येथिल प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू झाले ‘टेकामांडवा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शेळ्या-मेंढ्यां बांधत होतो या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना महिला संघटीका सिंधुताई जाधव व प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जिवन तोगरे १५ दिवसांच्या आत टेकामांडवा येथिल आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित न झाल्यास मुर्दा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता यांची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी दिनांक २८/०६/२०२१ रोजी अवघ्या चोवीस तासातच रुग्णालय सुरू करण्याचे आदेश व वैद्यकीय अधिकारी म्हणून श्रध्दा माडूरवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच रंगरंगोटी करून रुग्णालयाला नवी झळाळी देण्यात येणार आहे. शिवसेना महिला संघटीका सिंधुताई जाधव यांनी घेतलेल्या क्रांतीकारी निर्णयापुढे अखेर आरोग्य विभागाला नमवावे लागले.
परिसरातील जनतेला आरोग्याची सुविधा मिळावी या हेतूने पाच ते सहा वर्षांपासून लाखो रुपये खर्चून येथे आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली मात्र, कोणत्याही वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करण्यात आले नाही. त्यामुळे इमारत बांधून तशीच ओसाड पडून होती. त्यामुळे परिसरातील शेतकरी या इमारतीचा उपयोग शेळ्या-मेढ्या बांधण्याकरिता करीत होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे रूग्णसेवक जिवन तोगरे व शिवसेना तालुका संघटिका सिंधूताई जाधव रुग्णालय सुरू करण्याचा मुद्दा उचलून धरतात खळबळून जागे झालेल्या आरोग्य यंत्रणेने रुग्णालयाची पाहणी केली. लवकरच रंगरंगोटी करून रुग्णालय रुग्णाच्या सेवेत उपलब्ध करून देणार असल्याचे मा.डॉ.राजकुमार गहलोत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर स्पष्ट केले. डॉ.श्रध्दा माडूरवार यांच्याकडे या रुग्णालयाचे सुत्र सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णालयाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांनी अखेर दिलासा मिळाला आहे. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जिवन तोगरे व शिवसेना संघटीका सिंधुताई जाधव यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त करुन कौतुक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here