खासगी शाळांची शैक्षणिक फी माफ करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

0
752

खासगी शाळांची शैक्षणिक फी माफ करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

शैक्षणिक फी माफ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यांचा राजु झोडेंचा इशारा

चंद्रपुर, किरण घाटे वि.प्र. – मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे‌ सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नसल्यामुळे पालकवर्ग आर्थिक डबघाईस आलेला आहे. अश्या या महामारीच्या काळात खाजगी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शुल्क च्या नावाने आर्थिक वसुली करत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना धमकावून तुमच्या मुलांना परीक्षेला बसू देणार नाही असे सांगून फी वसूल करण्याचे काम करत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून विद्यार्थी शाळेत जात नसताना पालकांकडून अवैद्य फी वसुलीचे काम बंद करून संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे या मागणीला घेऊन वंचित बहुजन आघाडी कडुन शिक्षणाधिका-यांना आज निवेदन देण्यात आले.
कोरोना काळात दोन वर्षापासून शाळा बंद असून शाळांना कोणत्याही प्रकारचा खर्च नाही तरीसुद्धा खाजगी शाळा फी च्या नावाने पालकांना नेहमी त्रास देत असतात.शाळांनी कोणत्याही प्रकारची सेवा पुरवली नसताना पालकांनी फी देण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त ऑनलाइन क्लाँसेसच्या नावाने संपूर्ण फी घेणे हे चुकीचे आहे. खाजगी शाळांनी अवैद्य शुल्काच्या नावाने पालकांची फसवणूक करू नये व तात्काळ पूर्ण फी माफ करावी.
२०२०-२१-२२ या सत्रातील संपूर्ण फी खासगी शाळांकडून माफ करण्यात आली नाही तर वंचित बहुजन आघाडी कडुन या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचितचे नेते राजू झोडे यांनी प्रशासनाला दिला. निवेदन देतांना वंचितचे नेते राजू झोडे, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे,शहरअध्यक्ष बंडू ढेंगरे महिलाजिल्हा अध्यक्ष कविताताई गौरकर शहरअध्यक्ष तनुजाताई रायपूरे लताताई साव रामजी जुनघरे अविकान्त नरळ प्रमोद रणदिवे सोनू भुक्कया कृष्णा पेरकावार ईसरायल चेपूवार यांचेसह असंख्य पालक , कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here