भादा परिसरातील सोयाबीन पिकांनी माना टाकल्या शेतकरी हवालदिल दुबार पेरणीचे संकट…
औसा तालुका ग्रामीण/ प्रतिनिधी मारुती शिंदे
औसा तालूक्यातील भादा परिसरातील सोयाबीन पिकांनी माना टाकल्याचे चिन्ह परिसरात दिसून येत आहे या वर्षी काही ठिकाणी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने भादा परिसरातील भेटा, बोरगाव ,काळमथा,ऊटी बु,
लखनगाव, समदर्गा ,कोरंगळा, ब्रानपुर इत्यादी इत्यादी ठिकाणी पेरणी झाली यावर्षी या भागात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा झाल्याने व मृग नक्षत्रात पाऊस चांगला झाल्याने शेतकरी सुरुवातीच्या काळात आनंदी दिसला
परिसरात सोयाबीन आंतर्गत मशागत (कोळपणी) सुरु झाली मात्र गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने उघडडीप दिल्याने सोयाबीन माना टाकू लागले आहेत त्यामुळे कोरडवाहू शेतकरी हवालदिल झाला आहे कोरोना चे संकट अद्यापि घोंगावत असताना देखील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने उसनवारी करून खते व बियाणे खरेदी केली त्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत बियाण्याचे भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला तरीही काळ्या आईची ओटी भरूण ही पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे
भादा परिसर हा खऱ्या अर्थाने ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा हा परिसर असून ऊस या पिकाची मोठी लागवड या क्षेत्रात दिसून येते मात्र जून महिना संपला असला तरी या परिसरातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे या परिसराला तारणहार ठरणारा तावरजा मध्यम प्रकल्प यात ही पाणीसाठा अत्यल्प असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भविष्यात ऊस पिकासाठी पाणी मिळेल का नाही याची शंका भेडसावत आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे..