आमदार डॉ देवराव होळी यांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी निवेदन केलं सादर
✍️सुखसागर झाडे गडचिरोली:-
चामोर्शी येथील आमदार जनसंपर्क कार्यालय येथे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांची सरपंच मंगलदास आत्राम
व उपसरपंच रेखा देवतळे तसेच सदस्ययांनी भेट घेतली व निवेदन सादर केले. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली की. ग्रामपंचायत मुधोजी रिठ
येथील ग्रामसचिव बोकडे यांची ग्रामपंचायत मुधोली ( रीठ )येथून तत्काळ बदली करण्यात यावी. ग्रामसेवकांनी स्वतःच्या मनमर्जी प्रमाणे केलेल्या कोणत्याही कामाचे देयक अदा करण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. यावेळी प्रामुख्याने येथील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी येथील ग्राम सचिव मास्टर बोकडे यांच्या हिटलर शाही विरुद्ध व्यथा मांडली. ग्राम सचिव बोकडे हे ग्रामपंचायत कार्यालय येथे आठवड्यातून एकदा उपस्थित राहतात. सरपंच उपसरपंच यांना कोणतीही माहिती
न देता स्वतः ठेकेदारी पद्धतीचा अवलंब करून कमीशन घेऊन खिसा भरण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. विकास कामा बद्दल विचारणा केली तर उडवा उडविचे उत्तरे देऊन नेहमीच टाळाटाळ करतात. कोणताही
समन्वय न करता येथील ग्रामपंचायत कमेटी ला काहीच न विचारता हिटलर शाही प्रमाणे येथील ग्रामपंचायत सचिव बोकडे काम करीत आहेत. त्यामुळे सदर ग्राम सचिव यांच्या समस्त कामांची चौकशी करण्यात यावी.
ग्रामपंचायत मुधोली येथून तत्काळ हकालपट्टी करून नवीन ग्रामसेवक देण्यात यावे.अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली.
यावेळी येथील सरपंच मंगलदास आत्राम , उपसरपंच रेखा देवतळे ,ग्रामपंचायत सदस्या,लता येरमे , कविता ठाकूर,सोनल देवतळे , प्रमोद देव्हारेव गावकरी मंडळी उपस्थित होते.