प्रेयसीच्या प्रेमापोटी पतीने केली पत्नीची हत्या
दोन साथीदारांसह पतीस अटक…
राज जुनघरे
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
पत्नी असताना प्रेयसीला एक वर्षापासून सोबत ठेवल्याने घरात सतत खटके उडत होते.रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीचा काटा काढण्याचे ठरवून मित्रांना सोबत घेऊन कट रचून ३० जून ला रात्री १० वा. पत्नीचा खून केला. व अपघात झाल्याची बतावनी करीत कोठारी पो स्टे येथे तक्रार दाखल केली.या घटनेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून मर्ग दाखल केला .अखेर मृतकाचा नवरा गंगाधर सीताराम कणाके (२८) त्याचे दोन साथीदार राजकुमार बाबुराव कनाके (२२) रा कोठारी,शंकर रामल्लू गधमवारं (२०) रा दहेली यांना खून प्रकरणात अटक केली आहे. मृतक कविता गंगाधर कणाके कोठारी येथील रहिवासी आहे.३० जून ला उमरी फाटा ते कवडजई रस्त्याचे पुलाजवळ रात्री १०वा चे दरम्यान गंगाधर कंनाके व त्याची गर्भवती पत्नी कविता चिमूर येथुन कोठारी येथे राहते घरी येत असताना रानटी डुक्कराने दुचाकीस धडक दिल्याने गाडीचा तोल जाऊन अपघात झाला.त्यामध्ये गंगाधर याची पत्नी ही मरण पावल्याची तक्रार पोलीस स्टेशन कोठारी येथे दाखल केली.तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला.मर्ग चौकशीमध्ये सदरचा अपघात नसून घातपात असल्याची शंका पोलिसांना आली. तसेच मृतकाचे नातेवाईकांनी सदर मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. त्याप्रमाणे कोठारी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून त्याबाबत प्राथमिक माहिती काढली असता मृतकाचा पती गंगाधर कनाके याचा महिलेशी आपसी संबंध होता.तिच्यासोबत एक वर्षांपासून घरात पत्नीसोबत राहत असल्याने सतत वाद, तंटे मृतक कविता व गंगाधरशी होत होते. त्यास कंटाळून पत्नीचा काटा काढण्याचा गंगाधरने रचला त्यासाठी त्याने त्याचे मित्र शंकर रामलू गंधामवार (२०)रा दहेली, राजकुमार बाबुराव कंनाके(२२) रा कोठारी यांना पैसे देण्याचे कबुल करून कट रचून अपघाताचा बहाना करून पत्नी कविता गंगाधर कंनाके(२३)हिला जीवानिशी ठार मारले. यावरून अपराध क्र १३२/२१कलाम ३०२ व इतर कलम अनवये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर खुनाचा तपास ठाणेदार तुषार चौव्हान करीत असून ,सहा. ठाणेदार धीरज राजूरकर,इटनकर, बालाजी कवलकर, साई उपरे,श्रीनिवास जाधव, टेम्भुरने, सचिन पोहनकर, हरीश, देवळकर व माणिता जैस्वाल सहकार्य करीत आहेत. खुनाची चक्रे जलद गतीने फिरवून ठाणेदाराने आरोपीस त्वरीत अटक करून खुनाचे रहस्य लवकरच उघड केल्या जाईल असे सांगितले.