विनोदअण्णा भोसले यांना मराठा भूषन पुरस्कार जाहिर
परभणी जिल्हा प्रतिनिधी
आरूणा शर्मा
मागील वीस वर्षापासून मराठा समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे परभणी येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि शिवव्याख्याते विनोद अण्णा भोसले यांना पुणे येथील मातृसेवा संस्थेचा मराठा भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे
गेली 20 वर्षा पासून मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड,छ्त्रपती क्रांती सेना, स्वतः मुख्य सल्लागार असलेले नाना-अण्णा फाऊंडेशन व महापुरुषांच्या जयंती निमित्त व्याख्यानाच्या माध्यमातून मराठा समाजासह बहुजन समाजामध्ये पुरोगामी विचारांची पेरणी करत जन जागृती करणारे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या.मुंबई या महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून परभणी जिल्हासह मराठवाड्यातील अनेक मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल नसेल तर बीनव्याजी कर्ज उपलब्ध करून देवून प्रौत्सान देणारे परभणी जिल्हयातील गंगाखेड तालुक्यात मौजे इसाद या गावचे रहिवासी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले विनोदअण्णा रंगनाथराव भोसले यांनी आत्तापर्यंत निस्वार्थपणे केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुणे येथील मातृसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत काकडे यांच्या संस्थेच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा 2021 चा विशेष मराठा भूषन पुरस्कार महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र विनोदअण्णा भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठा समाजासह आणि क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे