डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न
𝙄𝙢𝙥𝙖𝙘𝙩 24 𝙣𝙚𝙬𝙨
अकोला जिल्हा प्रतिनिधी
मुकेश संतोष हातोले
९०२१६५२८४०
अकोला – दि.२ जुलै : पातुर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ 2021 संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.केशवरावजी मेतकर, कार्यकारणी सदस्य , श्री.शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती हे होते.मार्गदर्शक म्हनुन मा. श्री अशोकसिंहजी रघुवंशी सदस्य, महाविद्याल विकास समिती हे होते.प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री गुलाबरावजी ताले पाटील सदस्य, महाविद्यालय विकास समिती, डॉ. कृष्णरावजी भुस्कुटे सदस्य, महाविद्यालय विकास समिती, मा. श्री दादारावजी देशमुख आजीवन सदस्य, श्री.शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, सामाजिक कार्यकर्ते भाई रजनीकांत, मा.उदय शेंडे साहेब, डॉ.मेतकर, प्रभारी प्राचार्य डॉ. किरण खंडारे,कला शाखा विभाग प्रमुख डॅा. व्ही जी वसु, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. एच.ए.एकबोटे, विज्ञान शाखा विभाग प्रमुख डॅा.संजय खांदेल विचारपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतीमा पुजन व दिपप्रज्वलन करुन झाली. संगीत विभागाद्वारे प्रा. मंगेश राऊत आणि चमु यांनी स्वागत गीत सादर केले.त्यानंतर पदवी वितरण समारंभाची सुरुवात विद्यापीठ गीत सादर करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्तावीक मा. प्राचार्य डॉ.किरण खंडारे सर यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख मान्यवरांच्या समोर मांडला. महाविद्यालय कशा पद्धतीने प्रगती करीत आहे आणि त्यासाठी भविष्यकालीनयोजना काय आहेत हे मांडले. नुकताचं प्राचार्य पदाचा पदभार सांभाळल्यानंतर महाविद्यालयाच्या विकासासाठी नवनवीन योजनांची माहिती देखील त्यांनी यावेळेस दिली.
त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते मान्यवरांना महावस्त्र प्रदान सोहळा पार पडला.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवी समारंभाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस तीनही शाखेतील विभाग प्रमुखांनी आपल्या शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यांना पदवीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मा. दादारावजी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मा.उदय शेंडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विविध पुस्तकांची माहीती, वेबसाईटची आणि विविध नविन योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर मा. अशोक सिंह रघुवंशी सरांनी आपल्या भाषणामधुन सांगितले की,जीवनामध्ये यशस्वी होत असतांना शिक्षणासोबतचं आपल्या व्यवसायासाठी आणि व्यवसायाभिमुख होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याची माहिती देवुन जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रगती करण्यासाठी शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात मा. केशवरावजी मेतकर यांनी सांगीतले की, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक चांगला माणुस बनणे आवश्यक आहे. विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांमधील कला गुण ओळखून आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी कशाप्रकारे यशस्वी व्हावे याचे आपल्या उत्कृष्ट अशा वकृत्वशैलीतून विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन केले.पदवी समारंभाचे त्यांनी कौतुक केले कारण सर्व नियम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानुसार पार पाडले. त्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनाचे विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे संचालन डॅा दिपाली घोगरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अरविंद भोंगळे यांनी केले.
या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी प्रा. जगन्नाथराव अंधारे, प्रा अतुल विखे, प्रा. सुरेश लुंगे, प्रा. दादाराव गायकवाड , प्रा. गजानन जवंजाळ, प्रा. विवेक डिवरे, प्रा. नलिनी खोडे, प्रा.विजया उजाडे, प्रा. राहुल माहुरे तसेचं महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षक तसेचं शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.