मानकी येथे जि.प.शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार
वणी/प्रतिनिधी : तालुक्यातील माणकी येथे आज दि.१ जुलै ला जि.प. उच्च प्राथमिक शाळेत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका छायाताई आंबटकर व शिक्षक गुलाब आवारी यांचा सेवानिवृत्त पर सत्कार सोहळा शाळेचे मुख्याध्यापक आनंद पाटील व सर्व शिक्षकांसह शाळा समितीच्या वतीने घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा समितीचे सभापती अनिल ठेंगणे होते. तर शाळा समितीचे उपसभापती विजय काकडे, नवनिर्वाचित सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, ग्रां.पं. सदस्या इंदिरा परशुराम पोटे, नलीनी सुरेश मिलमीले, पोलिस पाटील मिनाक्षी सुजित मिलमिले, पत्रकार परशुराम पोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी आयुष्यभर कष्ट करून शिक्षण क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या शिक्षकांचा हा सन्मान म्हणजे भावनिक सोहळा गावचे सरपंच कैलास पिपराडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी सभापती अनिल ठेंगणे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात सेवा बजावून मुख्याध्यापिका छायाताई आंबटकर व शिक्षक गुलाब आवारी निवृत्त होत आहेत. त्यांनी आमच्यासारखे अनेक विद्यार्थी घडवले. समाजाला आदर्श वाटणाऱ्या शिक्षकांचा सन्मान जि.प.उच्च प्रा.शाळेच्या वतीने होणे हा संस्मरणीय क्षण आहे. तसेच पत्रकार व माजी सभापती परशुराम पोटे यांचा सहभाग प्रत्येक कार्यात असतो. या सहभागामुळेच शाळेतील उपक्रम यशस्वी होतात असे सांगितले. प्रास्ताविक करतांना शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आनंद पाटील यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आंबटकर यांचे व वरिष्ठ शिक्षक गुलाब आवारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले अशी माहिती उपस्थितांसमोर मांडली.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका छायाताई आंबटकर व शिक्षक गुलाब आवारी यांचा शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सरपंच कैलास पिपराडे, सभापती अनिल ठेंगणे, उपसभापती विजय काकडे, उपसरपंच शंकर माहुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच कैलास पिपराडे, सभापती अनिल ठेंगणे, उपसभापती गजानन काकडे, पत्रकार परशुराम पोटे, ७ व्या वर्गातील विद्यार्थीनी भाग्यश्री पुंड यांनी आप आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. सुत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका रोहीनी मोहितकर यांनी केले यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. यावेळी आंबटकर ह्या मुख्याध्यापिकाच नाही तर एका आई सारख्या सतत मार्गदर्शन करुन मोलाचे मार्गदर्शन केले असे त्यांनी सांगितले. आभार रामटेके सर यांनी मानले.
या कार्यक्रमास वरिष्ठ शिक्षक व माजी मुख्यध्यापक सुनिल लोणगाडगे, कैलास कुळमेथे, रामटेक सर यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.