बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड मिळणार घरपोच कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन

0
794

बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड मिळणार घरपोच कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन

 

 

प्रतिनिधी , शकील खान

अकोला :- राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणुने बाधीत रुग्ण आढळुन येत आहे. या विषाणुचा संक्रमणाचा दर जास्त असल्यामुळे विषाणुमधील बदल आणि त्यापासुन होणारा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्याचे दृष्टीने जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध घोषीत केले आहे. माहे जुन 2021 मध्ये ब्रेक द चेन कालावधीत ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज मंजुर झालेले आहेत व जिल्हा कार्यालयाकडुन ओळखपत्र (स्मार्टकार्ड) देणे बाबत लघुसंदेश (एसएमएस) प्राप्त झालेले आहेत असे बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात कामगार कार्यालयामध्ये येत आहेत. बांधकाम कामगारांचे संख्या मोठ्या संख्येने असल्याने कोविड प्रतिबंधात्मक नियमाचे व प्रशासनाव्दारे घोषीत निर्बंधाचे पालन होत नसल्याने बांधकाम कामगारांना कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाने. यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज यापुर्वीच मंजुर झालेले आहेत व बांधकाम कामगारांनी नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळाच्या बँक खात्यात जमा केलेले आहे, अशा बांधकाम कामगारांचे ओळखपत्र (स्मार्टकार्ड ) फिल्ड एजंट, खासदुत, कुरियर, पोस्ट ऑफिसमार्फत बांधकाम कामगारांच्या निवासी पत्यावर पाठविण्यात येत आहेत.

 

ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज दि 9 जून 2021 पुर्वी मंजुर झालेले आहेत तथापि, बांधकाम कामगारांना नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळ खाती जमा केलेली नाही, अशा बांधकाम कामगारांना मे. आयटीआय लिमिटेड व मे आरसीएस इन्फो प्रा. लि. या संस्थेकडुन लघुसंदेश (एसएमएस) व्दारे पेमेंट लिंक पाठविण्यात आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here